সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, February 02, 2018

बालाजी भक्तांनी फुलली क्रांती नगरी

गोवीदां गोवींदाच्या गजरात चिमुर नगरी मंत्रमुग्ध  

चिमुर/(विनोद शर्मा)
                 तिनशे नव्वद वर्षाची परंपरा असलेल्या क्रांती नगरीतील घोडा रथ यात्रेला २२ जानेवारी पासुन सुरुवात झाली . माञ प्रत्यक्षात सोमवारला रातघोड्या पासुन घोडा रथ यात्रेला प्रारंभ झाला .गुरुवारला दुपारी बारा ते तिन वाजता घोडा रथ यात्रेचा गोपाल काला हजारो अबाल वृद्ध  युवा बालाजी भक्ताच्या उपस्थितीत गोविंदा गोवीदा च्या गजरात " श्री चा गोपाल काला संपन्न झाला. या कारीता पंचक्रोषीतील हजारो  बालाजी भक्ताच्या उपस्थितीने क्रांती नगरी बालाजी भक्तांनी  फुलली होती.
                  पेशवाईच्या काळात जिर्णाद्वार झालेल्या या बालाजी मंदीराला ३९१ वर्षाचा ईतीहास आहे . मंदीराची वास्तू भोसले कालीन आहे चिमुर येथील घोडा रथ यात्रेला २४६ वर्षापूर्वी सुरुवात करण्यात आली . आजही तेवढयाच उत्साहात यात्रेत गावा गावातील बालाजी भक्त दर्शन घेण्यास मोठया संoयेने गर्दी करतात .
सोमवारला रात घोडयाच्या मिरवनुकीत हजारो भक्त रात्री एक वाजता   मोठया उसाहात सामील झाले होते. भक्ती सगींताच्या तालावर व आतीष बाजीने बालाजी भक्ताचे डोळ्याचे पारने फिटले तर गोविंदा - गोविदा च्या गजराने क्रांती नगरी दुमदुमुन गेली होती.

                         गुरूवारला बालाजी महाराजाच्या घोडा रथ यात्रेच्या नवरात्र समाप्ती ला गोपाल काल्याचे आयोजन करण्यात आले होते त्याकरिता आज सकाळ पासुनच बालाजी भक्तांच आगमन बालाजी मंदीर परिसरात होण्यास सुरूवात झाली . दुपारी दोन वाजता पर्यत पुर्ण परिसर बालाजी भक्तांनी हजारोच्या संर०येत गर्दी केली होती. दुपारला हभप खोडं महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर गोपाल काला करण्यात आला. याकरीता मदीराचे अध्यक्ष निलम राचलवार, अॅड ' चंद्रकांत भोपे,डाहुले, भलमे, डॉ दिपक यावले आदी उपस्थित होते.
                 महाशिवरात्री पर्यंत चाल णाऱ्या घोडा रथ यात्रेमध्ये बालाजी मंदीराच्या आवारात आमदार मितेष भांगडीया . आमदार कीर्तीकुमार भागांडीया . यांच्या वतिने कलकत्ता येथीत मॉं काली मंदीराची प्रतिकृती तयार केली आहे. ही प्रतिकृती बालाजी भक्तांचे लक्ष वेधुन घेत आहे. यात्रे दरम्यान चिमुर नगरीत मनोरजंनाच्या साधना सह, मौत का कुआ, आकाश पाळने, असे अनेक प्रकारच्या दुकानासह , मिनि सर्कस यात्रेकरूंचे लक्ष वेधत आहे.
               स्थानीक नगर परिषद प्रशासनाने बालाजी भक्तासाठी विविध सोई पुरवल्या आहेत. तर पोलीस प्रशासणाकडुन शा तंता वॅ सुव्यवस्था राखण्याकरीता १२५ कर्मचारी १o अधिकाऱ्याची नियुबनी केली आहे. त्यामध्ये दोन ठिकानी मदत केंद्र तयार केले आहे . तर मंदीर परिसरातुन जाणारी वाहतुक बंद करण्यात आली असून . ति वाहतुक मोठ्या मजीद पासुन कार्ट परिसरातुन वळवन्यात आली आहे.
अन् त्यांनी भरविला मायेचा घास
अवघ्या विदर्भात प्रसिद्ध असलेल्या क्रांती नगरीतील श्रीहरी बालाजी महाराज घोडा रथ यात्रेसाठी हजारोच्या संख्येत भाविक हजेरी लावून बालाजीला नतमस्तक होतात. यामध्ये अबाल वृद्ध महिला, युवक यांचा मोठा भरणा असतो. बाहेर गावातुन येणाऱ्या या बालाजी भक्तानी क्रांती नगरीतीन उपाशी जावू नये यासाठी क्रांती नगरीतील भाजपा, कॉग्रेस , शिवसेना , राष्ट्रवादी कॉग्रेससह स्थानिक स्वराज्य सस्था , स्वयंमसेवी संस्थेकडुन मसाला भाताच्या वितरणाचे स्टॉल लावून बाहेर गावातुन आलेल्या बालाजी भक्ताना मायेचा घास भरविला जातो.
             




শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.