पॅन कार्ड कंपनीच्या ग्राहक व मार्केटिंग पर्सन यांनी
नागपुरात निवासी जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन
पारशिवणी तालुका प्रतिनिधी :
सेन्ट्रल गव्हरमेन्ट नोंदणीकृत पैरोनॉमिक ग्रुप ऑफ कंपनीज समूहाच्या पैनकार्ड क्लब लिमिटेड कंपनी तिल विभिन्न योजनांमध्ये आपली जमा पुंजी जमा करणाऱ्या देशातील लाखो शेतकरि व मध्यमवर्गीयांचे साधारणात: ७ हजार ३५ कोटी रुपए गेल्या चार वर्षा पासून सेबी च्या कार्यवाही मध्ये अळकुन पडले आहेत.सेबी द्वारे कंपनी वर कार्रवाई करून कंपनी ची संपूर्ण मालमत्ता आपल्या ताब्यात घेण्यात आली आहे.परंतु ग्राहकांचे रुपये परत करण्यात सुरू असलेल्या सेबीच्या दिरंगाई मुळे पॅनकार्ड क्लब लिमिटेड कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या लाखो गुंतवणुकदारांना आपली गुंतवणूक परत मिळविण्यासाठी शासनाने उंबरठे झिजवावे लागत आहे. हताश झालेल्या ग्राहक व मार्केटिंग प्रतिनिधींनी लढा संघटनेच्या बॅनर खाली सेबीच्या व केंद्र सरकारच्या कारभारा विरोधात मंगळवार ता.३० ला संविधान चौक नागपूर येथे लढा वेलफेयर फाउंडेशन शाखा नागपूर च्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करीत आपल्या मागण्याचे निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.
गुंतवणूकदारांच्या हक्काची लढाई लढण्यासाठी अस्तित्वात आलेली लढ़ा वेलफेयर फाउंडेशन महाराष्ट्र प्रदेश (लढ़ा संघटना) व राष्ट्रशक्ति को-ऑर्डिनेंशन कमिटी यांच्या कडून ३० जानेवारी महात्मा गांधीच्या पुण्यतिथि दिनि राज्यव्यापी एक दिवसीय धरना प्रदर्शन आयोजित करण्यात आली होती.विदर्भातील नागपुर,भंडारा, वर्धा, चंद्रपुर, अमरावती सह समस्त जिल्ह्यांमध्ये कंपनी चे ग्राहक व मार्केटिंग पर्सन यांनी एकत्रित रित्या धरना प्रदर्शन करून सेबी विरोधात घोषणा केल्यात.ग्राहकांची रकम परत करण्यामध्ये केंद्र सरकार व सेबी कडून टोकाची भूमिका घेतल्या जात नाही. विदर्भातील ग्राहकांचे ३ हजार करोड़ इतकी राशि सेबी कडे अलकलेली आहे. १० सप्टेंबर २०१७ ला लढ़ा संघटने कडून महाराष्ट्रातील ४८ सांसदांच्या घरा समक्ष घँटा नाद करण्यात आले होते. निवेशकांच्या रकमेसाठि सर्वोच्च न्यायलय चे मुख्य न्यायाधीश, राष्ट्रपति,प्रधानमंत्री,वित्
नागपूर अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीस द्वारा विदर्भातील ग्राहकांची स्थिति केंद्र सरकार पर्यँत पोचवून सदर विषय गंभीरतेणे घेऊन लवकरच निकाली काढण्यासाठी मुख्यमंत्रि सदर विषयात रुची घेण्याचे देखील आश्वासन देण्यात आले होते.परंतु केंद्र सरकार देखील या विषयावर गांभीर्य पुर्वक लक्ष देत नसल्याचे समोर आले आहे.संविधान चौक नागपूर येथे जिल्ह्यातील शेकडो गुंतवणूकदारांनी मंगळवारला एकदिवसीय आंदोलन करून सेबीविरोधात निदर्शने केली.त्यानंतर लढा फाउंडेशन च्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन त्यांचे पैसे परत करण्यासाठी सहकार्य करण्याची मागणी केली.धरणे देण्यामध्ये लढ़ा वेलफेयर फाउंडेशन चे अध्यक्ष एस. डी. राउत, बी.एस. ऊके, एस. सी.मेश्राम, व्ही जे लोखंडे, एल के म्हात्रे, ए डी बनकर, एस डी फरकाडे, आनंद कांबले, अनिल चौबे, जितेंद्र तिवारी, हरीश पानपते, मारोती गड़े, प्रमोद बाविस्कर, एस आर डेगे, आर बी बिरनवार, अनिता चोले, लक्ष्मी माथरे, रेखा बावनगड़े सहित बड़ी संख्या में पैनकार्ड क्लब्स लिमिटेड चे ग्राहक व मार्केटिंग पर्सन उपस्थित होते.