चिमूर/ प्रतिनिधी:
कुणबी समाजाने जागृत होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे समाजाने संघटीत
होउून विविध क्षेत्रात कार्य करावे. शेतीपुरक व्यवसाय, सहकार क्षेत्रात
प्रगती साधीत सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमटावा, असे प्रतिपादन विमाशी
कार्यवाहक सुधाकर आडबाले यांनी केले.
चिमूर
तालुका कुणबी समजा संघटनेच्यावतीने आयोजित श्री गुरुदेव सांस्कृतिक भवनात
संत शिरोमणी जगतगुरु तुकोबाराय महाराजांच्या जयंतीनिमित्य घेण्यात आलेल्या
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी प्रमुख वक्ता म्हणून
मेघा रामगुंडे, डाॅ. संजय बोढे, निताताई लांडगे, रामभाउु थुटे, डाॅ.
चंद्रभान खंगार आदी उपस्थित होते.
यावेळी
प्रमुख वक्ता मेघा रामगुंडे यांनी समाजावर होणारा अन्याय व अत्याचारासाठी
रस्त्यावर येण्याची गरज असून मी सदैव तयार असल्याचे सांगितले. कुणबी
समाजाने जागृत व्हावे, शासन अनेक बाबतीत कुणबी समाजावर अन्याय करीत
असल्याचे त्यांनी परखडपणे आपले मत माडून समाजास जागृत करण्याचे कार्य
त्यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी कुणबी समाजाच्या समस्यांवर चर्चा
करुन आता कुणबी समाजाने जागृत होण्याची गरज निर्माण झाल्याचे सांगितले.
कार्यक्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज येथील विद्यार्थी प्रफुल नुले यांचा
दिल्ली येथे पथसंचालनात सहभाग झाल्यामुळे त्यांचे आईवडील यांचा भव्य
सत्कार करण्यात आला. तसेच संघटनेत वाढ करणार्या महिला नर्मदा भोयर, वंदन
शेषकर, श्रीमती वडस्कर, सुचिता शेषकर, श्रीमती मिलमिले, श्रीमती कराळे आदी
महिलांचा सत्कार करण्यात आला. समाजाचे वरिष्ठ मारोतराव अतकरे, दुधनकर,
तिवाडे, भोंगाडे, लांडगे यांनाही सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे
संचालन डाॅ. चंद्रभान खंगार यांनी केले. यशस्वीतेसाठी सहसचिव किर्ती
रोकडे, सचिव किशोर भोयर, नथ्थू भोयर, सजय दुधनकर, मधूभाउु काळमेघ, योगेश
ठुने, अतकरे, शास्त्रणकर, कुबडे, सुमित गेडेकर, प्रसिद्धी प्रमुख सुभाष
शेषकर, रामदास ठुसे, रोडे, गजानन कारमोरे, गजू बाळबुधे, पवन डुकरे आदींनी
परिश्रम घेतले.