चंद्रपूर/प्रतिनिधी:
विभागीय
तलाठी प्रशिक्षण केंद्र चंद्रपूर येथे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण तसेच
विविध प्रकारच्या आगी तसेच fire extinguishers हाताळण्याचे प्रात्यक्षिक व
प्रशिक्षण कार्यक्रमाचे आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे आयोजन करण्यात आले
होते.
चंद्रपूर सारख्या ठिकाणी व विदर्भातील अन्य
भागात उन्हाळ्यातील वाढते तापमान लक्षात घेता सर्व कर्मचारी यांना आगी
बाबत माहिती तसेच fire extinguishers हाताळता यावे हा या कार्यक्रमाचा
उद्देश होता. सदर प्रशिक्षणामध्ये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश
तेलतुंबडे, खाजगी औद्योगिक सुरक्षा रक्षक प्रशिक्षण केंद्र चंद्रपूरचे
संचालक तथा मास्टर ट्रेनर शशिकांत मोकाशे, सि.एस.टि.पी.एस.फायर विभागातील
कर्मचारी तथा शोध व बचाव पथकातील सदस्य विजय मोरे यांनी मार्गदर्शन केले.
सदर प्रशिक्षण व प्रात्यक्षिक कार्यक्रमास विभागीय तलाठी प्रशिक्षण केंद्र,
चंद्रपूरचे व्यवस्थापक जी.एस.खंडारे, सहाय्यक व्यवस्थापक
पी.आर.कासर्लावार, जितेन्द्र देठे उपस्थित होते.
