সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, February 06, 2018

सृष्टी भागवत राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यातून पहिली

 चंद्रपूर/प्रतिनिधी:
Srushti Bhagwat from Chandrapur District is the first in the state State Public Service Commission Examination | चंद्रपूर जिल्ह्यातील सृष्टी भागवत राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यातून पहिली मूल तालुक्यातील बेंबाळ येथील सृष्टी दिलीप भागवत ही विद्यार्थिनी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनुसूचित जाती महिला संवर्गात राज्यातून पहिली आली आहे. ती राज्य उत्पादन शुल्क विभागात उपनिरीक्षक पदासाठी पात्र ठरली आहे.
सृष्टीचे वडील शिक्षक तर आई गृहिणी आहे. तिचे प्राथमिक शिक्षण बेंबाळ येथील जि. प. शाळेत तर माध्यमिक शिक्षण ब्रम्हपुरीतील नेवजाबाई कन्या विद्यालयात झाले. त्यानंतर अभियांत्रिकीचे शिक्षण नागपुरातून पूर्ण केले. सृष्टीला दिल्ली येथील एका कंपनीत नोकरी मिळाली होती. मात्र, वडिलांच्या प्रोत्साहनामुळे ही नोकरी नाकारून तिने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. नियोजनपूर्वक अभ्यास आणि कठोर परिश्रमामुळेच यश मिळाल्याची प्रतिक्रिया तिने व्यक्त केली.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.