चंद्रपूर/प्रतीनिधी:

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर कार्यालयाव्दारे केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेमधून सन 2016-17 या अंतर्गत आदिवासी युवकांना नौकरी मिळवून देण्यासाठी Job Fair योजना राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने Technical (आय.टी.आय, पॉलीटेकनीक, इंजिनिअरींग) उत्तीर्ण उमेदवार तसेच Non Technical (बी.ए, बी.कॉम, बीएससी, 12 वी व 10 वी) उत्तीर्ण उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
त्यामुळे या प्रकल्पाच्या अंतर्गत येणा-या इच्छूक उमेदवारांनी पुढील प्रमाणे अर्जासोबत प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक आहेत. त्यामध्ये उमदेवार हा आदिवासी असावा, जातीचा दाखला, शैक्षणिक दाखला इत्यादी कागदपत्र जोडून अर्ज प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, प्रशासकीय इमारत पहिला माळा चंद्रपूर यांचेकडे दिनांक 25 जानेवारी 2018 पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. परंतु आता 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत अर्ज स्विकारण्यात येणार आहेत. त्यामुळे अधिकाधिक सुशिक्षीत आदिवासी मुलांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.