ब्रम्हपुरी ग्रामीण प्रतिनिधी : गुलाब ठाकरे
ब्रम्हपुरी तालुक्यात अन्न नागरी पुरवठा विभागाने निगर्मित केलेल्या रेशनवरील धान्य वाटपासाठी बायोमेट्रिक प्रणाली अंगठा लावा धान्य मिळवा ठरत आहे नेटवर्क मिळत नसल्यामुळे राशन ग्राहकाची डोकेदुखी ठरत आहे.
स्वस्त धान्य दुकानदारांना देण्यात येणाऱ्या धान्याचा मोठय़ा प्रमाणात काळाबाजार होऊ नये. यासाठी धान्य वाटपासाठी बायोमेट्रिक प्रणाली राज्यशासनाने विकसित केली.स्वस्त धान्य दुकानात असलेल्या या प्रणालीवर अंगठा लावा आणि धान्य मिळवा असा नावीन्यपूर्ण उपक्रम तालुक्यात राबविण्यात आला.राशन दुकानदार महिन्याला आपला कोटा पूर्ण करून ग्राहकाला दाखवत असतात.मात्र काही दुकानदार लाभार्थ्यांना धान्य देण्याऐवजी त्याची विल्हेवाट काळ्या बाजारात लावून स्वतचा स्वार्थ साधून घेतात. त्यामुळे एपीएल,अंतोदय, बीपीएल धारकांसह अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थी धान्यापासून वंचित राहात होते.या संदर्भात महसूल विभागाकडे वारंवार राशन ग्राहक वारंवार तक्रारी वर तक्रारी देवून अन्ननागरी पुरवठा विभागाला माहिती देत होते. तेव्हा गावात राशन ग्राहक आणि राशनदुकानदार यांच्या मध्ये वाद उफाळून येत होता. या सर्व बाबींचा विचार करून अन्न नागरी पुरवठा विभाग यांनी स्वस्त धान्य दुकानांच्या ठिकाणी बायोमेट्रिक पद्धत सुरू करण्याचा निर्णय घेतला. बायोमेट्रिक प्रणालीने रेशनवाटप योजनेची सुरुवात झाली. तालुक्यातील सर्व राशन ग्राहक स्वस्त धान्य दुकानदारांकडे जाऊन तेथील बायोमेट्रिक यंत्रावर आपला अंगठालावून स्वस्त धान्याचा लाभ घेत होते. बायोमेट्रिक यंत्रावर या प्रणालीमुळे काळ्या बाजारावर अंकुश बसणार असून जे खरोखरच लाभार्थी आहेत, त्यांच्यापर्यंत रेशनचे धान्य पोहोचणार आहे. आणि ही योजना यशस्वी झाली.
पण या योजनेला आता ग्रहण लागत आहे.बायोमेट्रिक मशीनला नेटवर्क मिळत नसल्यामुळे मशीनची लिंक नसल्याने अंगठा हा घेत नसायची त्यामुळे राशन चा लाभ घेता येत नव्हता. स्वस्त धान्य ग्राहक सतत तीन ते पाच दिवस राशन दुकानात राशन मिळण्याची प्रतीक्षा करत आहेत की कधी येणार नेटवर्क त्यामुळे आपल्याला राशन मिळणार पण नेटवर्क नसल्यामुळे लिंक ही राहत नसल्याने अंगठा लावा आणि धान्य मिळवा बायोमेट्रिक प्रणाली राशन ग्राहकाची डोकेदुखी ठरत असून अन्न नागरी पुरवठा विभागाने त्वरित नेटवर्क चा बंदोबस्त करावे अशी मागणी अन्न नागरी पुरवठा विभागाला राशन ग्राहकाला देण्यात येत आहे.