সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, December 07, 2017

मुख्याधिकारीची जिल्हाधिकारीकडे तक्रार

आमदाराच्या वाढदिवसानिमित्त भुमीपुजन सोहळा


चिमूर/ तालुका प्रतिनिधी
विधान परिषदेचे आमदार मितेश भांगडिया यांचा वाढदिवस शुक्रवार ८ डिसेंबरला आहे. यानिमीत्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन, चिमूर नगर परीषद क्षेत्रात नगर परिषद इमारत, सांस्कृतीक सभागृह, शासकिय वस्तीगृह इमारत बांधकामाचे भुमिपुजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम पत्रिकेत  मुख्याधिकारी यांनी नगरसेवक- पदाधिकारी यांचा चुकीचा प्रोटोकॉल लावल्याने मानापमान झाल्यावरून नगर परिषद कॉंग्रेस गट नेते कदीर शेख यांनी मुख्याधिकारी यांची तक्रार जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे .


चिमुर शहरात अनेक दिवसापासून स्थानिक राजकीय पुढारी , खासदार , आमदार , यांचे वाढदिवस होत असतात त्यामुळे यांच्या वाढदिवसाचे औचित्त साधुन भुमीपुजन किंवा उद्घाटन सोहळे आयोजीत करण्याची प्रथाच पडलेली आहे .चिमूरचे भुमिपुत्र व विधान परीषदेचे सदस्य मीतेश भांगडिया यांच्या ८ डिसेंबर रोजी असलेल्या वाढदिवसा निमीत्त चिमूर नगर परिषदेच्या इमारत , शहीद बालाजी रायपुरकर सांस्कृतीक सभागृह , व मागासवर्गीय मुलींचे शासकिय वस्तीगृह या इमारतीचे भुमिपुजन सोहळा आयोजीत करण्यात आले असुन याकरीता पक्षाचे नेते कार्यकर्ते पाहुणे आहेत . या कार्यक्रमाकरीता छापलेल्या निमंत्रण पत्रीकेत सहाय्याक आयुक्त समाज कल्याण विभाग , चंद्रपुर व मुख्याधीकारी नगर परिषद चिमूर यांची नावे विनीत म्हणुन आहेत .


निमंत्रण पत्रीकेत नगर परीषद सभापती , गटनेता , आणी नगर सेवक यांची नावे भाजपा नेते आणी कार्यकर्ते यांच्या नावाच्या नंतर नामोल्लेख केल्याने हा जानुन बुजुन हेतुपुरस्कर मुख्याधिकारी यांनी चुकीचे प्रोट्रोकाल लावल्याने काँग्रेस नगर सेवकांनी मानअपमानाच्या या प्रकरणाचा निशेध केला असुन , प्रोट्रोकाल पाडत नसलेल्या मुख्याधीकारी यांचे वर तात्काळ कार्यवाही करण्याची तक्रार जिल्हाधिकारी यांचेकडे काँग्रेस नगरसेवक गटनेता अ . कदीर शेख यांनी केली आहे . त्यामुळे या मानअपमान नाटयावर जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे .
साह्यक आयुक्त व मुख्याधीकारी यांना पडला प्रोटोकालचा विसर..
...... सामाजिक न्याय विभाग व नगर परिषद चिमुर अंतर्गत मंजुर इमारती बांधकाम भुमीपुजन कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रम निमंत्रण पत्रीका छापन्यात आल्या या पत्रीका मध्ये उपनगराध्यक्ष सभापती व नगरसेवक यांचे नांव क्रम प्रोटोकाल नुसार राजकीय पक्षाच्या पदाधीकांऱ्यांच्या प्रथम असायला पाहीजे मात्र राजकीय पदाधीकाऱ्यांच्या नावानंतर निमंत्रण पत्री छापन्यात आली. या प्रकारामुळे साहयक आयुक्त सामाजीक न्याय विभाग व नगर परिषद मुख्याधीकारी यांना विसर पडला आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.