সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, December 07, 2017

मद्यमुक्त महाराष्ट्रासाठी नेतृत्व करा

श्रमिक एल्गारचे सुप्रिया सुळेना आवाहन
 

यवतमाळ- सर्वपक्षीय दारूबंदीचे समर्थकांना घेवून मद्यमुक्त महाराष्ट्रासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी नेतृत्व करावे असे आवाहन श्रमिक एल्गारच्या अध्यक्षा अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी केले.
हल्लाबोल आंदोलनाचे दरम्यान यवतमाळ येथील महिलांना भेटून यवतमाळ जिल्हा दारूबंदीसाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी खंबीर पाठींबा जाहीर केला व राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष हे महिलांच्या मागणीला पूर्ण करतील असे आश्वासन दिले. या पाश्वभूमीवर श्रमिक एल्गारने मद्यमुक्त महाराष्ट्रासाठी त्यांनी पुढाकार घेण्याची मागणी केली.

खासदार सुप्रिया सुळे यांनी दारूबंदीला समर्थन जाहीर करताच, त्यांचे आदर्श घेवून माजी अर्थमंत्री, आमदार जयंत पाटील यांनी ‘राज्यात राष्ट्रवादी काॅंग्रेस सत्तेवर येताच एका दिवसात यवतमाळ जिल्हयाची दारू बंदी करू’ असे जाहीर केले, तसेच विधीमंडळात अशासकीय ठराव मांडण्याचे आश्वासन दिले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी ‘आम्ही यवतमाळ जिल्हा दारूबंदीच्या प्रश्नावर येत्या अधिवेशनात गोंधळ घालू’ असे वचन दिले, दारूबंदीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने घेतलेल्या सकारात्मक भूमिकेचे श्रीमती गोस्वामी स्वागत केले.
खासदार सुप्रिया सुळे यांनी आपण दारूबंदीला जाहीर पाठींबा दिल्यामुळे महाराष्ट्रात दारूबंदीसाठी प्रचंड सकारात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे. आपण तसेच राष्ट्रवादी काॅंग्रेस सारख्या मोठया पक्षानी गोर-गरीब महिलांच्या या लढयाला भक्कम साथ दिल्यामुळे सर्वं महिलांच्या मनात ‘मद्यमुक्त महाराष्ट्राची’ आशा पल्लवीत झाली आहे याकडे अॅड. गोस्वामी यांनी त्यांचे लक्ष वेधले.
आज प्रत्येक पक्षात दारूबंदीला समर्थन देणारे आमदार आहेत, हे नाकारता येत नाही. भाजपाचे सद्याचे अर्थमंत्री मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार, शिवसेनेचे डाॅ. निलमताई गो-हे, काॅंग्रेसचे बुलढाणाचे आमदार राहूल बोंद्रे यासारखे नेते दारूबंदीच्या मुद्यावर सकारात्मक आहेत. राजकारण व पक्षाचे पलीकडे जावून दारूबंदीच्या मुद्यावर सर्व पक्षाचे आमदार एकवटले तर मद्यमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार होवू शकते. सुप्रिया सुळे यानी दृष्टीकोनातून पुढाकार घ्यावा आणि सर्व पक्षाचे दारूबंदीला अनुकूल असलेले आमदार, विषेशतः महिला आमदार यांची एकजुट तयार करून, संपूर्ण महाराष्ट्रात दारूबंदीसाठी नेतृत्व करावे असे आवाहन अॅड. गोस्वामी यांनी केले.
गुजरात आणि बिहार नंतर महाराष्ट्र आपल्या नेतत्वाखाली संपूर्ण दारूमुक्त होऊ शकते. याकडे गोस्वामी यांनी सुप्रिया सुळे यांचे लक्ष वेधले. खासदार शरदचंद्र पवार साहेब हे मुख्यमंत्री असतांना, त्यांनीच पुढाकार घेवून गडचिरोली जिल्हयाची दारूबंदी करून महिलांची मागणी पूर्ण केली होती, त्यांनीच महाराष्ट्रात महिला धोरण आणले. त्यानंतर आपण स्वतः बेटी बचावचा नारा देत हे अभियान प्रभावीपणे राबविले. याकडे खासदार सुळे यांचे लक्ष वेधीत पवार साहेबांचा वारसा पुढे घेउन जायचे असेल तर आपल्या नेतृत्वाने यवतमाळ आणि सोबतच संपूर्ण महाराष्ट्राची दारूबंदी एक महत्वाचे पाउल ठरेल असा आशावाद अॅड. गोस्वामी यांनी व्यक्त केला.
मद्यमुक्त महाराष्ट्राचे आपण नेतृत्व केल्यास, यश निश्चितच आहे. व या ऐतिहासिक अभियानात माझे सारखे सामान्य कार्यकर्ते आपल्याला पूर्ण सहकार्य करतील.
संपुर्ण महाराष्ट्रात दारूबंदीच्या लढयासोबतच दारूबंदीची प्रभावी अमंलबजावणीसाठी सुध्दा आपण भूमिका घेतल्यास यशस्वी दारूबंदीचा माॅडेल जगासमोर उभा राहील असे अॅड. गोस्वामी यांनी त्यांना पाठविलेल्या पत्रातून आशा व्यक्त केेली आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.