चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर महानगर पालिकेने शहरात अतिक्रमण हटाव मोहिम हाती घेतली असून याची सुरुवात गुरुवारी बंगाली कॅम्प परिसरातून करण्यात आली.पालिक़ा प्रशासनाने जे सी बी मशीन आणि भारी भक्कम पोलीस ताफ्यासह बंगाली कॅम्प परिसरातील फुटपाथ वरील अतिक्रमण काढण्यात सुरवात केली.
सदर फुटपाथ मास विक्रेत्यांनी गिळंकृत केल्याने पाहिलॆला अतिक्रमण हटाव मोहीम हाती घ्यावी लागली, या अतिक्रमणामुळे पायी चालणाऱ्या नागरिकांना अडथडा निर्माण झाला होता. यातील काही अतिक्रमण धारकांनी रस्त्यावरील टिनाचे शेड आणि कच्चे बांधकाम सूचना व नोटीस देऊनही हटविले नव्हते .त्यामुळे
आज प्रशासनाच्या सूचनेनंतरही सूचनांचे पालन न करणाऱ्या व्यावसायिकांवर बुलडोजर चालविण्यात आला. यावेळी परिसरातील माहोल चांगलेच तापले होते . काही दुकानदारांनी याला विरोध दर्शवित सांगितले की आम्ही ३५
वर्षापासून या परिसरात दुकान लावले आहेत आणि आमच्या परिवाराचा उदरनिर्वाह याच
भारोष्यावर चालतो मात्र आज आमच्यावर उपासमारीची वेळ ओढवली असून आमचा
परिवाराचा उदरनिर्वाह कसा करायचं हाच प्रश्न पडला आहे.त्यामुळे आता या अतिक्रमण धारकांचाय दुकानावर बुलडोजर चाललय नंतर पालिका प्रशासन यांना काय पर्यायि व्यवस्था करून देणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले राहणार आहे.