चंद्रपूर/प्रतिनिधी:
मागील दोन महीन्याचे कालावधीत ATM धारक यांचे बॅक
खात्यातील पैसे दिल्ली व गुडगांव येथुन परस्पर विड्राल करुन नागरीकांची फसवणुक होत असल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्याने पोलीस स्टेशन वरोरा, रामनगर, राजुरा या ठिकाणी एकुण 09 गुन्हयाची नोंद आहे. सदरचे गुन्हे उघडकीस आणने चंद्रपुर पोलीसांकरीता आवाहनात्मक होते. परंतू सायबर पोलीस ठाणे येथील तपास पथकाने अहोरात्र मेहनत घेवुन अत्यंत क्लिश्ट व तांत्रीक स्वरूपाचे सदरचे गुन्हे उघडकीस आणुन मुख्य आरोपीसह एकुण 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
श्रीमती नियति ठाकर, पोलीस अधीक्षक चंद्रपुर, श्री. हेमराजसिंह राजपूत, अपर पोलीस अधीक्षक, चंद्रपुर यांचे मार्गदर्षनाखाली सायबर पोलीस ठाणेचे अधिकारी व कर्मचारी यांनी सदर गुन्हयांचे तपासास तात्काळ सुरवात करुन तक्रारदारांच्या बॅंक खात्यांचे स्टेटमेंट पासुन वेगवेगळया मुद्दयांवर विष्लेशण केले. विष्लेशण व केलेला तपास यावरून प्रथम तपास पथकाने वरोरा येथे राहणारा एटीएममध्ये जावुन 16 अकी नं. व पिन नं. चोरी करीत होता त्या आरोपीस दिनांक 25/11/2017 रोजी दुपारी अंत्यत शितफीने पोस्टे वरोरा अप. क्र. 1334/2017 कलम 420 भादंवि मध्ये अटक करून न्यायालयासमोर हजर करून पोलीस कस्टडी रिमांड घेतला. जलदरीतीने तपास करीत सदर गुन्हयामधील मुख्य आरोपी तसेच गुडगांव येथील ATM मधुन पैसे विड्राल करणारा आरोपी यांचे नांवे निश्पन्न करुन मुख्य आरोपी हा दिल्ली येथे असल्याचे विष्लशणामधुन माहीती प्राप्त केली. प्राप्त माहितीवरून तपास पथक दिनांक 29/11/17 रोजी दिल्ली येथे पोहचले. परंतू मुख्य आरोपीचा दिल्ली येथे शोध घेतल्यानंतर आरोपी हा चंदीगढ येथे पसार झाल्याची माहीती समोर येताच तपास पथक तात्काळ दिनांक 01/12/2017 रोजी चंदीगढ येथे पोहचले. व चंदीगढ पोलीसांची मदत घेेवुन आरोपीचा शोध घेतला तेव्हा आरोपी हा चंदीगढ येथील उद्योगपथ नगर ला लागुन असलेल्या एका आलिशान हॉटेलमध्ये असल्याचे समजताच सायबर पोलीस ठाणे येथील पथकाने मुख्य आरोपीस त्या हॉटेल मधुन ताब्यात घेवुन अटक कार्यवाही पुर्ण केली व मुख्य आरोपीकडुन मिळालेली माहीती व तांत्रीक विश्लेषण यावरून गुडगांव येथील ATM मधुन पैसे विड्राल करणाऱ्या दुसऱ्या आरोपीस दिनांक 02/12/2017 रोजी दिल्लीचे रेल्वे स्टेशन जवळ सापळा रचुन ताब्यात घेतले. आरोपीना चंद्रपूर येथे आणुन दिनांक 03/12/2017 रोजी न्यायलयासमोर हजर केले असता आरोपींचा 10 दिवस पिसीआर मिळाला आहे. यातील मुख्य आरोपी हा मलकानगिरी, राज्य ओडिसा येथील व दुसरा आरोपी हा नोनी, गया, बिहार येथील आहे.
अटक केलेले आरोपी यांनी गुन्हयाची कबुली दिली असुन त्यांची गुन्हा करण्याची पध्दत अशी आहे की, यातील मुख्य आरोपीने त्याचे साथिदारांना ATM कार्डवरील 16 अंकी नं. व पिन नं. कसे घ्यावे याचे प्रशिक्षण देवुन त्यांना अमरावती, चंद्रपुर, गडचिरोली, नांदेड, औरंगाबाद, वाशीम ईत्यादी वेगवेगळया ठिकाणी पाठविले. या ठिकाणी गेलेल्या आरोपींनी ATM मध्ये जावुन येथील ATM धारक पैसे काढत असताना येथील ATM वरील 16 अंकी नं. व पिन नं. यांची SHOULDER READING द्वारे चोरी करुन मुख्य आरोपीस फोनद्वारे देत होते. त्यावरून मुख्य आरोपी हा 16 अंकी नं. चा उपयोग करून गुडगांव व दिल्ली येथील ATM मधुन लाखो रुपये काढुन नागरीकांची फसवणुक करीत होता. चंदीगढ व दिल्ली येथुन अटक केलेल्या आरोपींकडुन काही बनावट ATM कार्ड, मोबाईल हॅन्डसेट, तसेच काही ATM वरील 16 अंकी नं. व पिन नं. नोंद असलेले नोटबुक असा मुददेमाल जप्त केला असुन त्याबाबत तपास सुरू आहे. चंद्रपुर पोलीसांनी तात्काळ गुन्हा उघडकीस आणुन केलेल्या या कार्यवाही मुळे गुन्हा करण्याच्या या पद्धतीमुळे भविश्यात नागरिकांची होणारी आर्थिक फसवणुक यावर नक्कीच प्रतिबंध होईल. नागरीकांना असे आवाहन आहे की, मध्ये पैसे काढतांना आपल्या कार्ड वरील माहिती कोणाला दिसणार नाही याची दक्षता घेवुन सावध राहावे.
सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याकरीता सायबर पोलीस ठाणे येथील पोउपनि. विकास मुंढे, ना पोशि सुधिर तिवारी, पो शि इमरान शेख , राहुल पोेंदे, महेश बोथले, प्रशांत लारोकर, छगन जांभुळे, नापोशि मुजावर अली, संतोश पानघाटे, निशांत जुनोनकर, पोशि वैभव पत्तीवार यांनी महत्वाची कामगीरी बजावली आहे.