सिंदेवाही/प्रतिनिधी :
नवरगाव येथे ट्यूशन क्लासेस घेणाऱ्या मनोज एकनाथ बोरकर (४०) यांची एका मुलीसोबत अश्लिल ध्वनीफित मागील ४-५ दिवसापासून नवरगावात व परिसरात चांगलीच व्हायरल झाली असून त्या ध्वनीफितमध्ये अत्यंत घाणेरडे शब्द वापरले असल्याने ध्वनीफित ऐकलेल्या नागरिकांनी संबधित व्यक्तीच्या घरासमोर हजारोंच्या संख्येनी निषेधातमक जमावकरून त्यांचेवर कारवाई करण्याची मागणी केली.
त्याचप्रमाणे संबंधित मुलींच्या आई वडीलांनी सिंदेवाही पोलिसात तक्रार दाखल करून कठोर कारवाईची मागणी केली आहे.
नवरगाव गेल्या काही दिवसांपासून मोबाईल वर सोशल मीडियाच्या माध्यमातून एक ध्वनिफीत व्हायरल होत होती ही परिसरातील लोकांच्या मोबाईलवर् व्हायरल झाली होती या प्रकाराने नवरगावात चांगलीच खळबळ उडाली होती.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सिंदेवाहीचे ठाणेदार इंगळे यांना सदर जमावाला शांत करण्यासाठी ठाण्यातून पोलिसांचा ताफा बोलाविला. जमावाने कोणताही अनुचित प्रकार केला नसून मुलींच्या जीवनाशी खेळणाऱ्या या मनोज बोरकर नामक ट्यूशन मास्तरावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून ठाणेदार इंगळे यांनी त्यांचेवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले व त्यांच्या घराची झडती घेवून २ मोबाईल व १ ट्यॅब ताब्यात घेतला. मात्र संतप्त प्रकरण शांतपणे हाताळून ठाणेदार इंगळे कोणताही अनुचित प्रकार होवू दिला नाही. आरोपीचा इतरत्र शोध घेवून आरोपीला अटक करून ३५४ ड, पास्को अंतर्गत ११,१२,५०९ आयपी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.पुढील तपास नवरगाव पोलिस करीत आहे.