সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, June 15, 2018

दारूने भरलेला ट्रक पलटला;नागरिकांनी दारू केली लंपास

शंकरपूर/प्रतिनिधी:
शंकरपुर पासून ४ किमी अंतरावर देशी दारूने भरलेल्या पिकप ट्रक गुरुवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास पलटला. शंकरपूर-चिमूर रोडवर टाकळी गावच्या समोर हि घटना घडली.ट्रक पलटी होताच चालक व साथीदार  घटना स्थळावरून फरार झाले.मिनी ट्रक क्रमांक MH 40 Y 8140 या ट्रकमधून वाहतूक करत होता. जिल्ह्यात दारूबंदी असतांना जिल्ह्याच्या हदीतून हि दारूची वाहतूक होत होती.चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या  खाली जाऊन पलटली असे सांगण्यात येत आहे. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून अपघात झालेली गाडी ताब्यात घेतली असता गाडीत सरकीच्या खाली २० हजाराची दारू व  वाहनांची किंमत ५ लाख रुपये असे एकूण ५ लाख २० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला,पोलीस घटना स्थळ गाठत परियंत नागरिकांनी बरीच दारू लंपास केली होती.  या घटनेंत चालक व त्याचे साथीदार फरार झाले असून पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मात्र जिल्ह्यात दारू बंदी असतांना दारू येतेच कशी चर्चा देखील घटनास्थळी बोलल्या जात होती.




শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.