नगर परिषद चिमूर यांचे दुर्लक्ष नगर परिषदेवर महिलांचा धड़क मोर्चा
चिमूर/ तालुका प्रतिनिधी:
चिमूर नगर परिषद मध्ये येत असलेल्या नवीन वस्ती पिंपळनेरी प्रभाग क्रमांक २ मध्ये गेल्या ६ वर्षे पासून पिण्याच्या पाण्याचा नाहक त्रास जनतेला होत असून या संबंधित कित्येक वेळा नगर सेवकाशी तोंडी तक्रारी केल्या व नगर परिषद येथे लेखी तक्रारी महिला पुरुष यांच्या स्वाक्षरी दिल्या गेल्या असून या पाण्याच्या समस्या अजून पर्यत सोडविण्याचा प्रयत्न नगर परिषद करीत नसून याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे महिन्यातून एकदा टँकर येत असून समस्त नागरिकांना पाण्याचा पुरवठा होत नाही व या ठिकाणी असलेली सार्वजनिक विहीर हि जुन्या काळातील असून ती ५ वर्षयागोदार खसली असून या विहिरीतील गाळ उपसून पक्या दर्जाचे काम करून देण्यात यावे याकरिता अगोदर ग्रामपंचायत मध्ये अनेक तक्रारी व ग्रामसभेत चर्चा करण्यात आल्या परंतु सरपंच व सचिव यांनी कुठलाही तोडगा या विषयावर काढला नसून मागील अडीच वर्षे पासून पिंपळनेरी हे गाव नगर परिषदेमध्ये समाविष्ट करण्यात आले असून या समस्सेकडे नगर सेवक व नगराध्यक्ष तसेच मुख्याधिकारी ,पाणी पुरवठा विभाग यांचे दुर्लक्ष होतांना दिसून आले असून या समस्या सोडविण्यात याव्यात याकरिता पिंपळनेरी प्रभाग क्रमांक . २ मधील ३० महिलांनी मिळून मुख्याधिकारी नगर परिषद कार्यालय चिमूर येथे पिण्याच्या पाण्याच्या समस्से विषयी निवेदन देण्यात आले .
चिमूर नगर परिषद मध्ये कांग्रेस चे गोपाल झाडे हे नगराध्यक्ष असून त्यांच्या स्वतः च्या प्रभागात भीषण पाणी टंचाई असताना मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याने महिला वर्गात त्रीव संताप ची लाट पसरली आहे विशेष सत्तेतील एका नगरसेवक अब्दुल कदिर शेख यांनी नारू ची समस्या तसेच आठवडी बाजार ची व्यवस्था बाबत आवाज उठवून घरचा अहेर दिला होता नगराध्यक्ष गोपाल झाडे हे कोणती कारवाई करून समस्या सोडविते या कडे लक्ष लागले असून नगराध्यक्ष वर लक्ष ठेवून पाठी मागून कारभार करणारा तो नगरसेवक कोण याची सुद्धा चर्चा रंगत आहे.
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
शहरात शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यू
-
जनप्रतिनिधींचे मागणीवर महापौर संदीप जोशी यांचे आवाहन : शुक्रवारी रात्री
९.३० ते सोमवार सकाळी ७.३० पर्यंत नागरिकांना घरातच राहण्याची विनंती नागपूर,
ता. १६...
पोळ्याच्या दिनी 'झडत्या'ची लोकसंस्कृती शेतकर्यांचे वैभव असलेला बैलांचा दिवस म्हणजे पोळा. वर्षभर राबणार्या बैलांची पिठोरी अमावश्येच्या दिवशी पूजा करून कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा हा सण उत्साहाने साजरा केला जातो. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांच्या खांदे शेकणीचा कार्यक्रम असतो. बैलांचे खांदे तूप किंवा तेल, हळद लावून शेकतात. 'आज आवतन घ्या अन् उद्या जेवायला या' या शब्दात बैलांना पोळ्याचे आमंत्रण दिले जाते. 'वाटी रे वाटी खोबर्याची वाटी, महादेव रडे दोन पैशासाठी, पारबतीच्या लुगड्याले छप्पन गाठी, देव कवा धावला गरिबांसाठी' एक नमन गोरा पार्वती, हर बोला हर-हर महादेव'. एक नमन गोरा पार्वती, हर बोला हर-हर महादेव | Har Har Mahadev Khabarbat™ https://www.khabarbat.in › 2013/09 एक नमन गोरा पार्वती , हर बोला हर - हर महादेव | Har Har Mahadev ... पोळ्याचा आनंद शेतकर्यांसाठी सुखदायक असतो. या पारंपरिक सणाचे स्वरूप ... पोळ्याचा आनंद शेतकर्यांसाठी सुखदायक असतो. या पारंपरिक सणाचे स्वरूप बदलत चालले असले तरी ग्रामीण भागात पोळ्याच्या दिवशी झडत्यांची लोकसंस्कृती आजही काय...
बल्लारपूर येथील बिबट रेस्क्यु आॅपरेशन एक थरारक अनुभव बल्लारपूर येथे घडलेला प्रसंग आयुष्यात नेहमीच स्मरत राहील असाच होता. तो दिवस. तिथला प्रसंग. तो थरार सुदैवानं मी बचावाल्यामुळ आपणाशी अनुभव कथन करीत आहे. - बंडू धोतरे उन्हाळ्याची सुरवात झाली. सकाळपासूनच उन्ह तापू लागत. त्यामुळे एप्रिल-मे महिन्यात दरवषी इको-प्रोतर्फे जंगल ट्राकिंग राबविण्यात येते. त्यानुसार जंगलात जाण्यासाठी सर्व कार्यकर्ते सोमवारी दि २१ एप्रिल रोजी भल्या पहाटे पठाणपुरा मार्गावरील कार्यालयासमोर जमली होती. त्यातच रविवारी सिंदेवाही तालुक्यातील नवरगांव लगतच्या आलेसूर गावातील विहीरीत पडलेल्या बिबटचे रेस्क्यु आॅपरेशन दरम्यान मृत्यू झाल्याने त्या घटनास्थळास भेट देऊन माहीती जाणून घेण्य़ाकरिता आपण तिकडे जावे आणि कार्यकर्त्यांना जंगलात पाठवावेए असा बेत सुरु होता. इतक्यात बल्लारपूर येथील वन परिक्षेत्र अधिकारी मोरे यांचा फोन आला. त्यांनी सांगितले किए बल्लारपूरमधील संतोषी माता वॉर्डातील सुरेश कैथवास यांच्या घरात सोमवारी पहाटे 5 वाजताच्या सुमारास प्रवेश केला आहे आपण यावे. मग ठरलेले बेत रद्द केले. लागलीच इको-प्...
परमात्मा एक मानव धर्म पावडदौणा, मौदा मौदा येथे महानत्यागी बाबा जुमदेवजीचे भव्य आश्रम मौदा येथे बाबांचे भव्य असे परमात्मा एक सेवक मानव धर्म आश्रम बनविण्यात आले आहे. याची स्थापना दि. २१ जून १९९८ ला २५ एकर जागेमध्ये करण्यात आली. या आश्रमाचे महात्मेय व उद्दीस्त बघून महाराष्ट्र शासनाने दि. १३ नोव्हेंबर २००९ रोजी राज्य निकष समिती, मंत्रालय मुंबई यांच्या बैठकीत झालेल्या ठरावाप्रमाणे तसेच ग्रामविकास व जलसंशाधन विभाग मंत्रालय मुंबई यांचे दि १७ डिसेंबर २००९ पत्र क्र. तीर्थवी २००९ प्र. क्र. ५३ योजना ७ नुसार राज्यस्तरीय तीर्थ क्षेत्र ब वर्ग स्थळ म्हणून घोषित करण्यात आले. महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे महापरिनिर्वानंतर मंडळाच्या वतीने मानव धर्माचा प्रचार व प्रसार करण्यात येत असून त्याच्या महान समाज कार्याला विनम्र अभिवादन करून त्याच्या समाज कार्याचा वारसा पुढे चालविण्याकरिता व त्याच्या सामाजिक कार्याच्या स्मुर्ती जागविण्याकरिता वर्षातून एक दिवस मानव धर्माचे सर्व सेवक बांधव एकत्रित यावे म्हणून बाबांच्या आदेशानुसार प्...