সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, February 08, 2018

मनपाच्या मालकीच्या मालमत्तांचा अहवाल तयार करा

  • महापौर नंदा जिचकार यांचे निर्देश : 
  • मालमत्तांमधून उत्पन्नवाढीसंदर्भात घेतला झोननिहाय आढावा
नागपूर,ता.८. नागपूर महानगरपालिकेचे उत्पन्न फार कमी आहे. ते उत्पन्न वाढण्यासाठी पदाधिकारी व प्रशासन प्रयत्नरत आहेत. शहरात अनेक ठिकाणी मनपाच्या मालकीच्या मालमत्ता आहे. त्यापासून मनपाला उत्पन्न मिळू शकते. त्यामुळे मनपाच्या मालकीच्या मालमत्तांचा अहवाल तयार करून सादर करा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी प्रशासनला दिले.

नागपूर महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास यांच्या अख्यतारीत येणाऱ्या समाजभवन, शाळा,उद्याने, ग्रंथालय, वाचनालय, व्यायामशाळा, बाजार आदीसंदर्भातील आढावा घेण्यासाठी गुरूवारी(ता.८) महापौर कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला उपमहापौर दीपराज पार्डीकर, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, मुख्य अभियंता विजय बनगीरवार, कार्यकारी अभियंता संजय गायकवाड, कार्यकारी अभियंता अनिरूद्ध चौंगजकर, सी.जी.धकाते, डी.डी.जांभूळकर,नासुप्रचे कार्यकारी अभियंता संजय चिमोटे, प्रमोद धनकर प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी महापौरांनी झोननिहाय असलेल्या मनपाच्या मालकीच्या मालमत्तांचा आढावा घेतला.यापासून कसे उत्पन्न वाढेल यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. शहरातील मनपाच्या पुरातन वास्तूंना मी स्वत: लवकरच भेट देईन, असे महापौर नंदा जिचकार यांनी सांगितले. मनपाच्या वास्तूंचा अहवाल मला सादर करण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी सर्व झोन सहायक आयुक्तांना दिले. बैठकीला मनपाच्या लक्ष्मीनगर झोनचे सहायक आयुक्त सुवर्णा दखणे, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त महेश मोरोणे, हनुमाननगर झोनचे सहायक आयुक्त राजू भिवगडे, धंतोली झोनच्या सहायक आयुक्त (अतिरिक्त कार्यभार) स्मिता काळे, नेहरूनगर झोनचे सहायक आयुक्त राजेश कराडे, सतरंजीपुरा झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वऱ्हाडे, आसीनगर झोनचे सहायक आयुक्त गणेश राठोड प्रामुख्याने उपस्थित होते.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.