वरोरा/प्रतिनिधी:
भीमा कोरेगाव शौर्य दिवसाच्या द्विशताब्दी वर्षानिमित्य रणसंग्रामात शहिदांना व शौर्यस्तंभाला मानवंदना देण्यासाठी गेलेल्या बहुजन समाजातील लोकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ व कटाचे सूत्रधार म्हणून कटघर्यात असणाऱ्या मनोहर भिडे , मिलिंद एकबोटे व आनंद दवे यांच्या अटकेच्या मागणीसाठी बहुजन क्रांती मोर्च्या तर्फे आज सोमवारी वरोरा तहसील कार्यालय समोर धरणे आंदोलन करत सचिन गोसावी याना निवेदन देण्यात आले.
भीमा कोरेगाव येथील दंगल ज्यांनी घडवून आणली त्यांना त्वरित अटक करण्यात यावी व निरपराध लोकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे या म्हणीसाठी वरोरा तहसील कार्यालयासमोर आज दि. ५ जानेवारी रोजी बहुजन क्रांती मोर्चा तर्फे धरणे आंदोलन करण्यात आले व नंतर तहसीलदार सचिन गोसावी यांच्या मार्फत देश्याच्या राष्ट्रपतींना निवेदन देऊन आरोपीना त्वरित अटक करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आले व मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला