पोलिसांच्या कारवाईला ग्रहण
घुग्घूस/प्रतिनिधी:
अनधिकृत व्यावसायिक संकुलाच्या वाहनतळासाठी ५० वर्षांपूर्वीचे जुने बसस्थानक पाडण्यात आले आहे. त्यामुळे बसस्थानक पडणार्यांवर कारवाईसाठी पत्रकार आणि नागरिकांनी ४ फेब्रुवारीपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. ५ फेब्रुवारी दुसºया दिवशीही हे उपोषण सुरू आहे. मात्र, जुन्या बसस्थानक कोणाच्या हद्दीत हा घोळ कायम असल्याने पोलिसांच्या कारवाईला ग्रहण लागले असल्याचे दिसत आहे.
घुग्घूस येथील जुने बसस्थानक पाडून अनधिकृत व्यावसायिक संकुलासाठी वाहनतळ केले आहे. यासाठी त्या व्यावसायिकाने सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांसह पदाधिकारी, अधिकारी आणि ग्रामपंचायत सदस्यांनाही हाताशी धरले आहे. याचा विरोध करीत सरपंच पुष्पा मेश्राम यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. मात्र, ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीद सार्थक करण्याऐवजी स्थानिक पोलीस अधिकारी अनधिकृत बांधकाम व्यावसायिकाकडून चिरीमिरी गोळा करण्याचे काम करीत असल्याने कारवाईकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. शासकीय मालमत्ता वाचविण्यासाठी कोणीही पुढे येत नसल्याने अखेर पत्रकार आणि नागरिकांनीच पुढाकार घेत बसस्थानक पडणाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी ४ फेब्रुवारीपासून आठवडी बाजारातील स्व. प्रमोद महाजन मंच येथे साखळी उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, जि. प.अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी जागेचा गुंता सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेसुद्धा अपयशी ठरले आहे. तर दुसरीकडे पोलीस विभाग बसस्थानक पडणाऱ्यांवर कारवाई करण्यास तयार नसल्याने दुसऱ्या दिवशीही ५ फेब्रुवारीला साखळी आंदोलन सुरूच होते.
या उपोषणाला 4/2/2018 ला जि.प.अध्यक्ष देवराव भोंगळे .भाजपा शहर अध्यक्ष विवेक बोडे ' भाजपा माजी शहर अध्यक्ष विनोद चौधरींना.ग्रां.प.सदस्य श्रीनिवास इसारप.५ फरवरीला ग्रां.सरपंच पुष्पा मेश्राम .रा.का.तालुका अध्यक्ष संजय भोंगले .माजी सरपंच शोभा ठाकरे .माजी उपसरपंच ज्ञानेश्वर पीम्पलशेंडे .माजी उपसरपंच संजय तिवारी .शिवसेना तालुका उपप्रमुख किशोर बोबडे .शिवसेना शहर प्रमुख मुन्ना लौडे .माजी प .स .सभापती रोशन पचा रे .कॉंग्रेस शहर अध्यक्ष जावेद शीदीकी .कॉंग्रेस युवानेता राजू रेड्डी .नकोडा,माजी उपसरपंच रुषि कोवे.रांका कामगार नेता सयद अनवर .ग्रां.प .उपसरपंच संतोष नुने .जेष्ठ नागरिक शामराव बोबडे .ग्रां.स .ममता खैरे .ग्रां.स .पवन आगदारी .जामा मजीद सदर इफ्तेकार अहंम सीदी की .ग्रां.स.पुंडलिक उरकुडे .माजी ग्रां.स .महा देव उरकूडे .तसेच गावातील नागरीक यांनी उपोषण स्थळांना भेट देऊन जुने बसस्थानक पाडणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली