भद्रावती/प्रतिनिधी:
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील तिरवंजा जंगलातील कक्ष क्र. २०३ मध्ये बांबू कापणी करत असतांना दबा धरून बसलेल्या अस्वलीने बांबू कापणी करणाऱ्या मजुरावर हल्ला चढविला यात एका मजुराचा जागीच मृत्यू झाला. तर इतर दोन मजूर गंभीर रित्या जखमी झाले आहे.हि घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. यात मजुरांनी अस्वलीपासून स्वरक्षण करतांना प्रतीउत्तारात त्या अस्वलीचा मृत्यू झाला.

भद्रावती तालुक्यातील तिरवंजा जंगलातील कक्ष क्र. २०३ मध्ये बांबू कापणीचे काम सुरु होते त्यासाठी मध्यप्रदेशातून बांबू कापणीसाठी मजूर वर्ग चंद्रपूर जिल्ह्यात आले होते.सकाळच्या सुमारास कक्ष क्र. २०३ मध्ये बांबू कटाईचे काम सुरु असतांना लपून बसलेल्या अस्वलीने हल्ला केला यात धरमसिंग टेकाम ( रा. बालाघाट ) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर प्रेमलाल सयाम आणि संबल सिंग नामक २ मजूर गंभीर जखमी आहेत. जखमींना सामान्य रुग्णालयात दाखल केले. मजुरांनी केलेल्या प्रतिहल्ल्यात अस्वल ठार झाले.