সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, December 08, 2017

"मानवी हक्कांच्या संरक्षणाची गरज"

10 डिसेंबर जागतिक मानवी हक्क दिना निमित्त माझा लेख....!
------------------------------------------------


        आज १० डिसेंबर,म्हणजेच जागतिक मानवी हक्क दिवस,देशभरात आजचा दिवस म्हणजे भारतीय संविधानाने दिलेल्या मानवी हक्कांची उलगडा करून,मानवाधिकारांच्या सर्व प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी या दिवसांमध्ये राजकीय परिषदा, बैठका, प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, वादविवाद आणि अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. बर्याचशा सरकारी नागरी आणि बिगर सरकारी संस्था मानवी हक्क कार्यक्रमांत सक्रियपणे सहभागी होतात.
देशातील नागरीकांना हक्काची जनिव करून देणारा दिवस,आज देशात मानवी हक्कांचा पाडा वाचल्या जात तर कुठे अमलबजावणी च्या नावाने डंका ठोकवल्या जाते.
      मानवी हक्क मग नागरी हक्क असोत की राजकीय हक्क,  अथवा कायद्यासमोर समानतेचा हक्क, सन्मानपूर्वक जीवन जगण्याचा हक्क, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शिक्षण, स्व-विकास हे सारे हक्क एकमेकांना पूरक आहेत. यातील एका हक्काची गुणवत्ता वाढते तेव्हा पर्यायाने इतर हक्कांचीही गुणवत्ता आणि दर्जा वृद्धिंगत होतो. तद्वतच एखाद्या हक्काची पायम्मली होत असेल तर स्वाभाविकपणे विपरीत परिणाम दुसऱ्या हक्कांवर होतो. त्यामुळेच मानवी हक्काविषयी विविध संस्था, संघटना जागरूक बनल्या आहेत. समाजातील वेगवेगळ्या उपेक्षित गटांना आणि घटकांना त्यांचे कायदेशीर हक्क मिळण्यासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवी हक्क उच्चायुक्त कार्यालय व मानवी हक्क समिती ह्या दोन संस्था जागतिक स्तरावर मानवी हक्कांच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करतात. 
   नागरिकत्वाला मिळालेला संवैधानिक हक्क म्हणजे त्या व्यक्तीचा,त्या समाजाचा अस्तित्व आहे,म्हणून सर्वसाधारण मानवी हक्काची जाणीव तमाम नागरिकांना असणे आवश्यक आहे,देशात नागरिकांना मिळालेल्या समानतेचा हक्क,अभिव्यक्ती स्वातंत्रांचा हक्क,शोषणापासून संरक्षणाचा हक्क,धार्मिक निवडीचे स्वतंत्र,सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क,भाषा स्वतंत्र,जीवणाधिकार,गुलामीपासून मुक्ती अश्या समानतेच्या अनेक हक्क या सामान्य नागरिकांना मिळालेली एक सविधानाची देणगी होय,अनेक वर्षे वरील हक्कापासून हा मानव वंचित होता,जणू मानवी जीवन त्या चार वर्णव्यवस्थेशी जुळुनच आमचं जीवन आहे असं समजणाऱ्या या मानवांच्या प्रतिकारासाठी या देश्यात अनेक महापुरुषांनी समतेच्या, स्वातंत्रेच्या हक्कासाठी मानवी जीवनाला या गुलामीच्या वेतने पासून मोकळा स्वास देण्यास रक्त सांडले,तेव्हा कुठे हा स्वतंत्र आम्हला मिळाले,शिक्षणाचा स्वतंत्र, अभिव्यक्ती स्वातंत्र्य अश्या अनेक हक्काने या मानवी जीवनाला उज्जवल करणारे महापुरुष म्हणजे,फुले,शाहू,आंबेडकरच.
  अस्पृश्यता, गुलामी,लिंग भेद,वर्णभेद,जातीभेद, धर्मभेद अश्या अवस्थेवर अवलंबून असलेल्या या देशाला एक समान नागरिकत्वाचा अधिकार मिळाला खरे,पण या अधिकारावर,मानवी हक्कावर गधा आखल्या जात असल्याचे अनेक उद्धहरण देता येतात,दहशतवाद, युद्ध, विविध प्रकारचे भयंकर गुन्हे, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणते,अशा अनेक मार्गांनी जगभरातील नागरिकांमध्ये असंतोष पसरला असून आजही मानवी हक्कांची पायमल्ली सुरूच असल्याचे विदारक चित्र आज दिसत आहेत,ऍम्नेस्टी इंटरनॅशनलद्वारे १६० देशांमध्ये गेल्या वर्षभरातील विविध घटनांमध्ये मानवी हक्कांची पायमल्ली झाल्याची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार २०१४ मध्ये जगात सुमारे १८ लहान-मोठी युद्धे झाली. ३५ हून अधिक देशांमध्ये विविध घटनांमध्ये लष्करी कारवाई करण्यात आली. युरोपात पोचण्याचा प्रयत्न करणारे तब्बल ३४०० निर्वासित भूमध्य समुद्रात बुडाल्याचे मानले जात आहे. तर सीरियामधील चार दशलक्ष निर्वासितांपैकी ९५ टक्के नागरिक शेजारील देशांमध्ये पळून गेले. १६० देशांपैकी ११९ देशांच्या सरकारने अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली, अनेक ठिकाणी वर्तमानपत्रे बंद पाडण्यात आली तर अनेक पत्रकारांना धमकावण्याच्या घटना घडल्या,महाराष्ट्रात देखील अनेक वृत्तपत्र बंद पाडून,लोकशाहीच्या चौथ्या आधार स्थंभाला घात पोहचला आहे, असे नागरिकत्व हिरकावून घेण्याचे कटकारस्थानही या महाराष्ट्रात घडत आहेत,स्त्री स्वातंत्र्यावर देखील या देश्यात सर्वात मोठा गधा आखल्या जात आहेत.
        देशात राजकीय व सामजिक क्षेत्रात आपलं वर्चस्व साधणाऱ्या,सविधानाच्या,व्यक्ती स्वतातंत्र्याच्या ,अभिव्यक्तीच्या बळावर आवाज उठवणाऱ्यांचेही आवाज दाबण्याचे कटकारस्थान या देश्यात आपल्याला पाहायला मिळत आहेत,अनेकांच्या मुसक्या आवळलेलीही उधाहारण देता येतील,समाजामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सहाय्याने,अंधश्रद्धा मुक्त भारत च्या स्वप्नांत असलेले डॉ.नरेंद्र दाभोळकर,कॉ.गोविंद पानसरे,डॉ.एम.एम.कलबुर्गी सारख्या विचारवंतांचेही हत्या करून मानवी हक्काचे मुसक्या अवळलेली ही घटना या मानवी हृदयाला यातना पोहचंवणाऱ्या आहेत,ह्याच नसून देश्यात कित्येक व्यक्ती आपल्या स्वातंत्र्यापासून वंचित आहेत यांचे बेतच नाही,शासकीय सेवेत उच्च निच्छता,समाजात स्त्री पुरुष भेद,धर्मीक दंगली,विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काचे व्यासपीठ नमिळणे,युवकांचा आवाज दाबणे,अश्या एक ना अनेक क्षेत्रात मानवी हक्कांची भंग होत आहेत,यासाठी या देशात मानवी हक्काची ओळख प्रत्येक तळागाळातील नागरिकांना करून देण्याची काळाची गरज आहे,संघटित पणे आवाज उठवुन अभिव्यक्ती च्या खिलाफ,स्वतंत्र हिरावून घेणाऱ्या,आणि लोकशाहीच्या या स्वतंत्र राष्ट्रात आम्हाला गुलामीत राबवणाऱ्यांची वेळीच ठेचून मानवी हक्कांच्या संरक्षण करणे काळाची गरज वाटते.
 


लेखक :- श्रीपाद नागनाथ राऊतवाड
              मो.८००७८७००२६
              नांदेड.
 

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.