शेतकरी हितार्थ मागण्या शासनापर्यँत पोचविण्यासाठी निमेखडा येथे आयोजन
पारशिवणी ता. प्रतिनिधी:
प्रशासना विरोधात रोष व्यक्त करणारी राजकीय व सामाजिक नेतृत्वातून आंदोलने अनेकदा
झालीत परंतु राज्य भरात प्रहार संघटनेच्या आंदोलनाची चर्चा औरच असते अश्यात
रामटेक,पारशिवणी,मौदा तालुक्यातील शेतकरी शाषणाच्या उदासीन धोरणांमुळे
हतबल झालेले असताना आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्या रामटेक
विधान सभा शाखेच्या नेतृत्वात क्षेत्रातील शेतकरी वर्गाला शाषणा विरोधात
एल्गार फुंकण्यासाठी गावपातळी पासून तर तालुकास्तरापर्यंत प्रहार स्टाइलची
आंदोलने पुकारण्या च्या हेतून एकजुटीने शेतकरी वर्गाला एकत्रित आणण्याचे
कार्य सध्या प्रहार करत आहे.क्षेत्रातील शेतकरी,शेतमजूर,दिव्यांग
युवक,बेरोजगारांच्या प्रश्नांवर शिवसेना-भाजप युती सरकारच्या अन्यायकारी
धोरणाचा निषेधार्त प्रहार हंटरमार शेतकरी आक्रोश सभेचे आयोजन ता.६ डिसेंबर
ला निमखेडा (गो.पा.) येथे करण्यात आले आहे.सभेला आमदार बच्चु कडू,प्रहार
रामटेक विधान सभा क्षेत्राचे संयोजक रमेश कारेमोरे यांची प्रमुख उपस्थिती
असणार आहे.
प्रहार शेतकरी
संघटना रामटेक क्षेत्र प्रमुख महेंद्र भुरे यांच्या कडून मिळालेल्या
महितीनुसार हंटरमार सभेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या धान,कापूस,तुर सह इतर
शेतमालाला हमी भाव,शेतकर्याना सरसकट कर्ज माफीतुन सात बारा कोरा
करणे,नागपूर शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी इतर व्यवस्था करून पेंच
प्रकल्पाच्या पाण्याचे शेती सिंचनासाठी आरक्षन वाढवा,पेंच प्रकल्पाच्या
सिंचन क्षेत्रातील शेतकऱ्यांना शेतात बोरवेल,विहिरी करण्यासाठी तात्काळ
उपाय योजना करून अनुदान देणे,पिक विम्याची प्रलंबित रक्कम शेतकऱ्यांना
देणे, सिंचन विभागाच्या भोंगळ कारभारामुळे पेंच प्रकल्पाच्या सिंचन
क्षेत्रातील शेतकऱ्यांनि लागवट केली नाही अश्या शेतकऱ्यांचा सर्व्हे करून
मोबदला देन्यात यावा,शेतातून गेलेली महावितरण विभागाची ११ केव्ही विज
टाकण्यासाठी ज्या शेतकऱ्यांच्या शेतात टॉवर उभे केलेत त्यांना प्रतिमहिना
भाड द्यावं,मायक्रोफायनान्स चे कर्ज माफी,दिव्यांग,विधवा,परीतक्ता, ज्येष्ठ
नागरिक यांना मिळणार्या संजय गांधी,श्रावण बाळ,निराधार योजनेच्या अनुदानात
वाढ करावी या विषयांना घेऊन प्रशाषणाला धारेवर घेण्यासाठी या सभेचे आयोजन
केल्याची माहिती दिली. सभेला प्रहार संघटनेचे महेंद्र भुरे,प्रा.राजू
भडके,संगीता वांढरे,आकाश दिवटे,श्रीकांत बावनकुळे,विनय चौधरी,राधेश्याम
नखाते,मोहन लोहकरे,शांताराम ढोंगे, सुखदेव मथुरे,प्रयास ठाकूर,ललित
दोंदलकर,राहुल पानतावणे,नरेश हिंगे यांची देखील उपस्थिती असणार आहे.