সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, December 04, 2017

आपल्या कार्याचा सन्मान झाल्याने आशा सुखावल्या

रामटेक तालुक्यांतील उल्लेखनिय कार्य करणाऱ्या अशांचा सत्कार

रामटेक तालुका प्रतिनिधी:
यावर्शी प्रथमच आशा दिवस कार्यक्रम साजरा करण्यांत आला.दिनांक 1 डिसेंबर हा जागतीक एडस दिन आशा दिन  म्हणून साजरा करावा असे निर्देष असल्याने रामटेक तालुका आरोग्य अधिकारी यांचे विद्यमाने रामटेकच्या राजीव गांधी सभागृहांत या विषेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यांत आले होते.

यावेळी रामटेक तालुक्यांत उल्लेखनिय कार्य करणाऱ्या  व सर्वत जास्त मोबदला प्राप्त आशा  स्वयंसेविकांचा नागपुर जिल्हा परीशदेचे उपाध्यक्ष षरद डोनेकर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी रामटेकचे गटविकास अधिकारी यावले,तालुका आरोग्य अधिकारी चेतन नाईकवार,डॉ निषांत शेख,डॉ.अश्विनी डंभारे,डॉ.आर.एल.कुबडे, व सुरेश भुजाळे आदी मान्यवरउपस्हिात होते.आशा  च्या पुढाकाराने ग्रामीण भागातील एचआयव्ही बाधितगरोदर मातांकडून एचआयव्ही संसर्ग होवू नये यासाठी नेव्हरपीन देवूनप्रतिबंध घालने व एचआयव्ही बाधीतांना एआरटी उपचारासाठी प्रवृत्तकरणे सुकर झाले आहे.एडस प्रतिबंधासाठी प्रभावी जनजागृती करण्यात आशा  स्वयंसेविकांचा सहभाग व भूमीका अतिशय मोलाची असल्याचेमत शरद डोनेकर यांनी व्यक्त केले.या कार्यक्रमांत आशाच्या कार्याची आठवण व्हावी व त्यांचेहीआरोग्य सुयोग्य राहावे यादृश्टिने या कार्यक्रमाचे आयोजन असल्यानेयावेळी त्यांचे डोळयांची तपासणी करण्यात आली.राज्याचे आशा कार्यक्रम अधिकारी अनिल नक्षिने यांनी या योजनासाठी योग्य ती शासन मान्यता मीळवून घेतल्याने या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनकरण्यात आले असे डॉ नाईकवार यांनी यावेळी सांगीतले.आशा  स्वयंसेविका श्रीमती वैषाली बावनकुडे,वृंदाउईके,नलिनी अहिरकर,पुश्पा ठाकरे व वंदना वाडीवे या सर्वात जास्तमोबदला प्राप्त करणाऱ्या व श्रीमती कुंदा मोरगडे,वच्छला चाफले,उशा शेंडे ,सारीका लाडे,व करूणा पौनीकर या उल्लेखनिय कार्य करणाऱ्यांचा यावेळी विशेष सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यांत आला.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.