कंत्राटी कामगार व शिकाऊ उमेदवांच्या प्रश्नांकरिता तांत्रिक अप्रेंटीस असेासिएशनचा एल्गार
नागपूर/प्रतीनिधी :- गेल्या कित्तेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आय.टी.आय शिकाऊ उमेदवारांच्या मागण्यांसाठी तांत्रिकअॅप्रेंटीस असोसिएशनच्या नेतृत्वात हजारो विध्यार्थ्यांच्या उपस्थितीत हिवाळी अधिवेशन कालावधीत दिनांक १२/१२/२०१७ पासून विधानभवनासमोर १० दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. रविवारी क्रीडाचौक येथील तांत्रिक भवन नागपूर येथे तांत्रिक अॅप्रेंटीस असोसिएशन चे राज्याध्यक्ष प्रभाकर लहाने यांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक अप्रेंटिस असोसिएशनची शिकाऊ व कंत्राटी कामगारांची बैठक पार पडली या बैठकीत संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत ननोरे व नागपूर जिल्हाअध्यक्ष मनीश धारम यांनी यावेळी हि माहिती दिली.
विदयुत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन रं.न.1029 प्रणित तांत्रिक अॅप्रेंटीस असोसिएशन महावितरण,महापारेषण ,महानिर्मीती कंपनीमधील शिकाऊ उमेदवार व कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर राज्याचे उर्जामंत्री महोदयांनी 10 जानेवारी 2017 रोजी बैठक बोलावुन शिकाऊ उमेदवार आरक्षण,शिकाऊ उमेदवार वाढीव विदयावेतन,सरळ सेवा भरती,महावितरण कंपनीमध्ये शासनाच्या नियमाप्रमाणे वयोमर्यादा,ईएसबीसी निवड यादी व ईतर प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याचे आदेशित केले होते.परंतु तिन्ही विज कंपनीप्रशासनाने कोणतीही कार्यवाही न करता वेळ काढु धोरण अवलंबित केल्यामुळे राज्यातील कंत्राटी कामगार व शिकाऊ उमेदवारांमध्ये असंतोष निर्माण निर्माण झाल्यामुळे त्यांच्या न्याय हक्कासाठी हिवाळी अधिवेशनात विधानभवन नागपुरच्या समोर दि.12 डिसेंबर 2017 पासुन उपोषण करण्यात येणार असल्याची माहीती माहीती तांत्रिक अॅप्रेंटीस असोसिएशन चे राज्याध्यक्ष प्रभाकर लहाने यांनी प्रसिध्द केलल्या पत्रकात दिली आहे.
तिन्ही विज कंपन्यामध्ये शिकाऊ उमेदवारांना 80 टक्के आरक्षण देण्यात यावे,(उर्जामंत्री महोदयांनी आरक्षणास तत्वतः मान्यता देवनु सुध्दा प्रशासनाने लागु केले नाही.)उपकेंद्र सहायक पदाची परीक्षा घेवुन भरती प्रक्रीया त्वरीत राबविण्यात यावी,महावितरण कंपनीमध्ये शासनाच्या नियमाप्रमाणे वयोमर्यादा वाढ करण्यात यावी,कंत्राटी कामगार व शिकाऊ उमेदवरांचे शासनाच्या राजपत्रकानुसार मुळ वेतनामध्ये वाढ करण्यात यावी,तिन्ही कपंनीमध्ये रिक्त असलेल्या तृतीय व चतुर्थ श्रेणीतील कामगारांची सरळ सेवा भरती प्रक्रीया त्वरीत राबवावी,महापारेषण कंपनीमध्ये तारतंत्री उमेदवारांना संधी देण्यात यावी,तिन्ही कंपनीमध्ये सरळ सेवा भरती परीक्षा घेतांना पदासाठी आवश्यक असणाऱ्या शैक्षणीक अहर्तेनुसार परिक्षा घेण्यात यावी ,ईएसबीसी उमेदवारांना विदयुत सहायक पदावर सामावुन घेण्यात यावे आदी प्रलंबित प्रश्नांवर या अगोदर मा.उर्जामंत्री महोदयांनी प्रश्न सोडविण्याचे प्रशाकीय अधिकाऱ्यांना आदेशित केले होते.तरी सुध्दा यावर कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे तांत्रिक अॅप्रेंटीस असोसिएशन व प्रशासनाविरूध्द एल्गार पुकारला असुन हिवाळी अधिवेनात विधान भवन नागपुर समोर राज्यस्तरीय उपोषण करण्यात येणार आहे.
सदर आंदोलन विदयुत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन चे केद्रीय अध्यक्ष आर जे देवरे, उपाध्यक्ष रवि बारई,बी आर पवार,केद्रीय सरचिटणीस आर. टी. देवकांत,केद्रीय उपसरचिटणीस गजानन सुपे,दिलीप कोरडे,प्रविण पाटील,राज्यसचिव उदय मदुरे,कोशाध्यक्ष संतोश घाडगे,तांत्रिक शक्ती संपादक आनंद जगताप,कामगार कल्याण विष्वस्त रवि वैदय,शैलेश पेंडसे,आदी मान्यवरांच्या मार्गदर्शनात करण्यात येणार असून आंदोलनामध्ये राज्यातील शिकाऊ उमेदवार व कंत्राटी कामगारांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन तांत्रिक अॅप्रेंटीस असोसिएशन चे राज्याध्यक्ष प्रभाकर लहाने, तसेच विदर्भ अध्यक्ष प्रशांत नन्नोरे यांनी केली.या सभेस ललित लांजेवार, किशोर फाले,राजकुमार गोतमारे,नरेंद्र तिजारे,रोशन देशमुख,मनीष धारम,किशोर सावरकर,अतुल चरडे,जय वानखेडे,राहुल गवते,उमेश कामडी,अमित चापके,मयूर बुराडे,निखिल वाघ यांचेसह नागपूर शहर व ग्रामीण प्रविभागातिल शिकाऊ उमेदवार हजर होते
.