সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, December 05, 2017

दिंदोडा प्रकल्पग्रस्तांचा मोर्चा धडकला जिल्हाधिकारी कार्यालयावर

 न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलनाच ईशारा 
चंद्रपूर/प्रतिनिधी:
दिंदोडा प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी अनेक वर्षांपासून संपादित करण्यात आल्या मात्र अजून पर्यंत शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळाला नाही व अद्याप शासनाने कोणत्याच प्रकरणात अजूनही दखल घेतलेली नाही.  त्यामुळे याचा निषेध करत मंगळवारी (आज) दिंदोडा प्रकल्पग्रस्तांनी हजारोंच्या संख्येने जनता कॉलेज पासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढला.
दिंदोडा प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी १९९९ ते २००० या कालावधीत वर्धा, चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी निप्पोन डेंनो प्रकल्पासाठी संपादित करण्यात आल्या होत्या.हा प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यातील दिंदोडा गावाजवळील वर्धा व वेणा नदीच्या संगमावर प्रस्तापित होता. त्या प्रकल्पातील सर्व पाणी निप्पोन डेंनो विद्युत प्रकल्पासाठी जाणार होते. त्यावेळी फक्त ३० हजार रुपये प्रति एकर जमिनीचा मोबदला देण्यात आला होता व प्रति एकर एक लाख रुपये अनुदान देण्याचे मान्य करण्यात आले होते.
त्या प्रकल्पाचे ८० टक्के पाणी वर्धा पॉवर, जीएमआर व इतर विद्युत प्रकल्पाला व उर्वरित २० टक्के पाणी शेतीसाठी देण्याचे ठरले. मात्र १७ वर्ष होऊन सुद्धा प्रकल्पाला सुरुवात झाली नाही. या दरम्यान शेतकऱ्यांच्या व पर्यावरण विभागाच्या अनेक बैठक झाल्या मात्र मोबदला देण्याबाबत कोणतेही दखल घेतली गेली नाही. 
मागील वर्षांपासून शांततामय वातावरणात नदीच्या तीरावर विविध आंदोलने प्रकल्पग्रस्तांनी केली मात्र शासनाने कोणतीच दखल घेतली नाही तसेच प्रकल्पग्रस्तांचे निवेदन स्वीकारण्यासाठी एकही संबंधित अधिकारी उपस्थित झाले नाही. म्हणून न्यायाच्या मागणीकरिता आज दिंदोडा प्रकल्पग्रस्तांनी हजारोंच्या संख्येने जनता कॉलेज पासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढला. व आपल्या मागण्यांचे निवदेन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. 
या नंतर सुद्धा दिंदोडा प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाला नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असे संघर्ष समितीचे अध्यक्ष पुंडलिक तिजारे, उपाध्यक्ष अभिजित माढेकर, सचिव चंपतराव साळवे यांनी सांगितले आहे.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.