नागपूर : कमाल चौकातील एका अपार्टमेंटच्या टेरेसवर सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर पाचपावली पोलिसांनी धाड टाकली. पोलिसांनी पार्लरचे संचालक पवन मोरयानीला अटक करून हुक्क्याचे सामान जप्त केले आहे. कमाल चौकात साईनाथ अपार्टमेंट आहे. पोलिसांना अपार्टमेंटच्या टेरेसवर फिरंगी रेस्टॉरंटच्या नावाने हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी मंगळवारी रात्री तेथे धाड टाकली. तेथे पवन मोरयानी ग्राहकांना हुक्का उपलब्ध करून देताना आढळला. पोलिसांनी पार्लरमधून हुक्क्याचे सामान जप्त करून पवनला अटक केली. पवनही साईनाथ अपार्टमेंटमध्ये राहतो. त्याने काही दिवसांपूर्वी हुक्का पार्लर सुरू केले होते. पवन यापूर्वी जुगार अड्ड्यावर पकडल्या गेला होता. पोलिसांना त्याच्या हुक्का पार्लरमध्ये चर्चेत असलेले लोक सापडण्याची अपेक्षा होती. ही कारवाई पोलीस उपायुक्त राहुल माकनीकर, सहायक पोलीस आयुक्त वालचंद मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक नरेंद्र हिवरे, रवींद्र दुबे, उपनिरीक्षक पी. आर. इंगळे आणि सहकाऱ्यांनी पार पाडली.
Wednesday, December 06, 2017
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
वाडीत शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षा रामभरोसेअपुरी वाहतूक पोलीस यंत्रणा महामार्ग ओलांडताना विद्यार्थ्याची तारेवरची कसरतवा
सर्व मोबाईल टॉवरला अस्थायी परवानगीनागपूर/प्रातिनिधी:शहरातील विविध भागात ७६८ अनधिकृत मोबाईल टॉवर असून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानु
सौर कृषी वाहिनी योजना : विदर्भातील १५७१ शेतकऱ्यांचे अर्जवाशीम जिल्ह्यातून सार्वधिक अर्ज भंडारा जिल्ह्यातून २०० अर्ज नागपूर/ प्रतिनिधीमुख्यम
पशुपक्षी प्रदर्शनात नागपुरी म्हशीचा पहिला नंबर नागपूर/प्रतिनिधी:जालना येथे झालेल्या २ ते ४ फेब्रुवारीदरम्यान अखिल भारतीय पशुपक्षी प्रदर्शनात नागपु
वाडीत सापडला युवकाचा मृतदेह वाडी(नागपूर )/अरूण कराळे येथील संत ज्ञानेश्वर ले आउट येथील हनुमान मंदिराच्या बाजूला असलेल्या ट
गट ग्रामपंचायत चांपा तर्फे आयोजित हळदी-कुंकू कार्यक्रमाला महिलांचा उदंड प्रतिसादअनिल पवार/उमरेड:गट ग्रामपंचायत चांपा यांच्यावतीने आयोजित मकरसंक्रांत निमित्ताने हळदी-कुंकुच्या कार्
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য