সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, December 06, 2017

नागरिकांच्या पाण्यासंबधीच्या तक्रारी तातडीने सोडवा

 राजेश घोडपागे  : जलप्रदाय समितीची आढावा बैठक


नागपूर  : नागरिकांच्या दूषित पाण्यासंबंधीच्या तक्रारी वारंवार येत आहेत. पाण्यासंबंधीच्या तक्रारी तातडीने सोडविण्याचे निर्देश जलप्रदाय समिती सभापती राजेश घोडपागे यांनी दिले. मंगळवारी (ता.५) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात जलप्रदाय समितीची आढावा बैठक पार पडली.

यावेळी समितीचे उपसभापती महेंद्र धनविजय, सदस्या रूपाली ठाकूर, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) संजय गायकवाड, जनरल मॅनेजर पी.एस.राजगिरे, डी.पी.टिपणीस, ओसीडब्लूचे के.एम.पी.सिंह, राहुल कुळकर्णी, अझीझ रहमान प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी दूषित पाण्यासंदर्भातील झोननिहाय आढावा जाणून घेतला. यामध्ये लक्ष्मीनगर झोनमध्ये एक तक्रार, धरमपेठ झोनमध्ये आठ, हनुमाननगर झोनमध्ये दोन, नेहरूनगर झोनमध्ये चार, गांधीबाग झोनमध्ये तीन, सतरंजीपुरा झोनमध्ये पाच, लकडगंज झोनमध्ये तीन, आसीनगरमध्ये पाच, मंगळवारी झोनमध्ये आठ तक्रारी आतापर्यंत आल्या असल्याची माहिती ओसीडब्लूच्या अधिकाऱ्यांनी दिली. या सर्व तक्रारी दोन महिन्यांच्या आत सोडविण्यात याव्या, असे आदेश सभापती राजेश घोडपागे यांनी दिले.

काही भागात रस्त्याचे काम सुरू आहे, अथवा पाईपलाईन दुरूस्तीचे काम सुरू असल्यामुळे पिण्याचे पाणी दूषित येत आहे. त्यावर बोलताना सभापती म्हणाले, संबंधित अधिकाऱ्याने जागेवर भेट देऊन पाहणी करावी. अडचणी असल्यास त्या तातडीने निकाली काढण्याचे आदेश सभापती घोडपागे यांनी दिले. यानंतर समितीने लो प्रेशर, थकीत पाणी बिलाची वसुली यासंदर्भातील आढावा घेतला. थकीत पाणी बिलाची वसुली तातडीने करण्यात यावी, असे आदेशही सभापती घोडपागे यांनी दिले. बैठकीमध्ये पाणी पुरवठा व वितरण व्यवस्थेचा आढावाही घेण्यात आला. बैठकीला ओसीडब्लूचे अधिकारी व डेलिगेटस्‌ उपस्थित होते.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.