সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, November 18, 2017

बाजार समितीच्या बाहेर शेतमालाची विक्री

लाखो रूपयांचा बाजार सेस बुडाला

ललित कनोजे
रामटेक/प्रतिनिधी-
रामटेक तालुका बाजार समीतीच्या शितलवाडी,रामटेकच्या बाजार आवारांत धान व कापूस या पीकाची अत्यल्प आवक असून प्राप्त माहीतीनुसार शेतकरी आपला माल बाजार समीतीच्या आवारांत न आणंता थेट व्यापा-याला विक्री करीत असल्याचे वृत्त आहे.बाजार समीतीचे प्रशासन या गंभीर प्रकाराकडे कानाडोळा करीत असल्याने बाजार समीती रामटेकच्या शीतलवाडी आवारांत शेतमालाची आवक अतिशय कमी झाली आहे.जो माल ईथे आला आहे त्याला उठाव नाही असा दुर्दैवी प्रकार घडत असून बाजार समीतीचा लाखो रूपयांचा बाजारसेसही बुडत असल्याचे समजते.

रामटेक तालुक्यातील शेतक-यांना आपल्या मालाची विक्री करता यावी यासाठी शितलवाडी येथे मोठया उत्साहांत शेतमाल खरेदी विक्रीचा शुभारंभ काटापुजनाने करण्यात आला.सध्या शेतकÚयांकडे धानाचे पीक तयार असून काही भागात लोकांनी कापसाची लागवड केली होती त्यामुळे कापसाची आवकही बाजार समीतीच्या आवारांत अपेक्शित होती.ते लक्शात घेवूनच बाजार समीतीने स्थानीक आमदार डी.मल्लिकार्जुन रेड्डी यांचे शुभहस्ते काटापुजन केले मात्र मालाची आवक म्हणावी तशी होत नाहीये.
मागील महीन्यांत बाजार समीतीचे विभाजन करण्यांत आले असून रामटेक व मौदा अशा दोन स्वतंत्र बाजार बाजार समीत्या निर्माण करण्यांत आल्या व रामटेकच्या बाजार समीतीवर रामटेकच्या सहायक निबंधक भारती काटूळे यांची नियुक्ती करण्यांत आली.त्या दैनंदिन बाजार समीतीच्या कारभारावर नियंत्रण ठेवू शकत नसल्याने सर्व कारभार हा सचिवांच्या हातात एकवटला आहे व बाजार समीतीत त्यांचा मनमर्जी कारभार सुरू असल्याचे बोलले जात आहे.
बाजार समीतीबाहेर काही व्यापारी व राईस मीलमालक हे शेतकÚयांचा धान घेत असून शेतकÚयांना नागवित आहेत.असे असले तरी शेतकरी त्यांना आपला माल विकत आहेत कारण बाजार समीतीत एकदोन अडत्यांनी शेतकÚयांना बुडविले.त्यांना त्यांच्या मालाची रक्कम दिली नाही.कास्तकारांनी हा विशय बाजार समीती प्रशासनाकडे नेला मात्र प्रशासनानेही थातुरमातुर उत्तरे दिली.अडत्याला बाजार आवारांत आडत करण्यास मज्जाव करण्यांत आले मात्र यात गरीब शेतकÚयांचे पैसे बुडाले.या अनुभवाने कास्तकार आपला माल रामटेकच्या बाजार आवारांत आणण्यास धजावत नसल्याचेही वृत्त आहे.रामटेक बाजार समीतीने अनेकांना व्यापारी म्हणून अनुज्ञप्ती दिली आहे.त्यांनी रामटेकच्या बाजार आवारांत होणा-या खरेदी-विक्रीच्या कामांत सहभागी होणे गरजेचे आहे मात्र ईथे आले तर शेतक-यांचा माल चढया भावाने खरेदी करावा लागतो त्यामुळे हे सर्व व्यापारी राईसमील मालंकासोबत साटेलोटे करून बाजार समीतीच्या आवाराबाहेर शेतक-यांचा माल खरेदी करीत असल्याचे गावागावांमधून समजते.असा व्यवहार त्यांनी केला तर त्याला पायबंद घालण्याची व त्यांचेकडून बाजारसेस वसूल करण्याची तसेच त्यांचेवर दंडात्मक कारवाई करणे एवढेच नव्हे तर त्यांची अनुज्ञप्ती रद्द करण्याचे काम बाजार समीती सचिव व प्रशासकाचे आहे मात्र याकडे प्रशासनाचे पुर्णतः दुर्लक्श आहे असे दिसते याचे कारण काय?बाजार समीतीचे प्रशासन तर त्यांना सामील नाही नां?असा प्रश्न यानिमीत्ताने चर्चिला जात आहे.नाही म्हणायला बाजार समीतीने यावर प्रतिबंध घालण्यासाठी व अशा गाडया पकडण्यासाठी सचिवांच्या नेतृत्वात फिरते पथक तयार केले आहे असे कळते.या पथकाने तालुक्यांत दौराही केला मात्र त्यांना एकही असा प्रकार आढळला नाही असे बाजार समीतीच्या सुत्रांनी सांगीतले.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.