সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, February 06, 2018

पालकमंत्री बावनकुळे आश्वासनानंतर दणकाचे उपोषण समाप्त

  • 15 दिवसांत होणार कोल्हेंची गच्छंती  *कारवाई न झाल्यास पुन्हा उपोषण-योगेशवाडीभस्मे
रामटेक तालुका प्रतिनिधी:
खोटे शपथपत्र सादर करून रामटेक कृषी उत्पन्न बाजार समीतीचे मुख्यप्रशासक पद बळकावणारे आदर्श विद्यालयांतील शिक्षक अनिल लक्ष्मण कोल्हे यांना येत्या पंधरा दिवसांत पदावरून हटविले जाईल असे आश्वासन  पालकमंत्री नामदार चंद्रशेखर  बावनकुळे यांनी दिले व याबाबतचा चौकशी अहवाल जिल्हाउपनिबंधक नागपुर यांनी राज्याचे पणण सचिव यांना पाठविला आहे. त्यात दणका संघटनेने केलेले सर्व आरोप खरे असल्याचे स्पष्ट   नमूद केले असल्याने कारवाई अटळ त्यामुळे बाजार समीती रामटेकच्या आवारापुढिल प्रवेश  द्वारावर सुरू असलेले अजय किरपान यांचे आमरण उपोषण समाप्त करण्यांत आले आहे.रामटेकचे उपविभागीय अधिकारी राम जोशी  व रामटेकच्या सहायक निबंधक भारती काटूळे यांनी अजय किरपान यांना निंबूपाणी देवून उपोषणाची सांगता करण्यात आली.यावेळी दणका युवा संघटनेचे संस्थापक योगेशवाडीभस्मे,समाजसेवक राजेश जयस्वाल, माजी सभापती नंदलाल चैलीवार,जितेंद्र बावनकुळे, सौरभ पोटभरे,दिनेश नानवटकर, योगेशआकरे, प्रविण मस्के आदींसह दणकाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येत उपस्थित होते.

रामटेक तालुका कृषी उत्पन्न बाजार समीतीचे मुख्यप्रशासक हे रामटेकच्या आदर्शविद्यालयांत शिक्षक या पदावर असल्याने त्यांची राज्य सरकारने मुख्यप्रशासक या पदावर केलेली नियुक्ती नियमबाहय आहे.नियुक्ती व्हावी यासाठी कोल्हे यांनी सादर केलेल्या पत्रांत नोकरी ऐवजी शेती हा धंदा असल्याचे नमूद केले आहे.व कुठेही नोकरी करीत नसल्याची खोटी माहीती दिली आहे.त्यामुळे त्यांची उपरोक्त पदावरून उचलबांगडी करावी व खोटे शपथपत्र सादर केल्याने त्यांचेवर पोलीसांत गुन्हा नोंदविण्यांत यावा या मागणीसाठी रामटेक दणका युवा संघटनचे अध्यक्ष अजय किरपान यांनी दिनांक 5 फेब्रुवारी 2018 सोमवारपासुन आमरण उपोषण बसले होते

अलिकडे रामटेक तालुका कृषी उत्पन्न बाजार समीतीवर राज्य सरकारने 17 सदस्यीय प्रशासक मंडळ नेमले.या प्रशासक मंडळाचे मुख्य प्रशासक असलेले अनिल लक्ष्मण कोल्हे हे रामटेकच्या शाळेत  सहायक शिक्षक या पदावर कार्यरत असल्याने ते या पदासाठी अपात्र ठरतात.त्यांनी यासाठी खोटे शपथपत्र सादर केल्याचा आरोप यापुर्वीच अजय किरपान यांनी संबधित अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातुन केला व त्यांना तात्काळ या पदावरून दूर करावे व शासनाची दिषाभूल केल्याने त्यांचेवर पोलीसांत गुन्हा नोंदवावा अशी मागणी केली होती.

यादरम्यान कोल्हे यांचेबाबत तक्रारीची चौकशी करण्यासाठी जिल्हानिबंधक,नागपुर यांनी आदेश दिले होते.त्यांच्या आदेशानुसार रामटेकच्या सहायक निबंधक भारती काटूळे यांनी चौकशी  करून तसा अहवाल जिल्हा निबंधक यांचेकडे पाठविला असे सांगीतले.हा अहवाल राज्य सरकारला पाठविण्यांत आला व शासनाकडून कारवाईचे आदेशलवकरच प्राप्त होतील त्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक सतीश भोसले यांनी कळविले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

केवळ चौकशी देखावा करून अपात्र व्यक्तिला पदावर ठेवण्याचे कोल्हे यांच्या पाठीराख्यांचे प्रयत्न आहेत.मात्र त्यांना असे करता येणार नाही.नियमानुसार याप्रकरणी कारवाई होण्यासाठीच आपण उपोषण करीत होतो असे किरपान यांनी यावेळी सांगीतले.सरकारने  याप्रकरणी 15 दिवसांत कारवाई न केल्यास पुन्हा आमरण उपोषणाचे शस्त्र बाहेर काढू असा इशारा  योगेशवाडी भस्मे यांनी यावेळी दिला.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.