সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, February 09, 2018

शासकीय कार्यालयांकडे महावितरणची १७ कोटी रुपयांची थकबाकी

  • सर्वाधिक थकबाकी पाणी पुरवठा योजना आणि पथ दीव्यांकडे

नागपूर,दिनांक ९ फेब्रुवारी २०१८

वीज देयकाची थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने आक्रमक मोहीम सुरु केली असून नागपूर परिमंडलातील सुमारे ४० हजार शासकीय कार्यालयाच्या वीज जोडण्याकडे १७ कोटी रुपयांची थकबाकी वसूल व्हावी यासाठी थकीत रकमेचा भरणा करा अन्यथा वीज पुरवठा खंडित करण्यात येईल अश्या आशयाची नोटीस बजावणे सुरु केले आहे. थकबाकी न भरणा-या शासकीय अस्थापनांचा वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु करण्यात येणार आहे.

थकबाकीदार वीज ग्राहकाकडून वसुली व्हावी यासाठी मुख्य अभियंतापासून सर्व वरिष्ठ अधिकारी वर्गाने जातीने शाखा कार्यालय, उपविभागीय कार्यालयात भेटी देऊन आढावा घेणे सुरु केले आहे. नागपूर परिमंडलातर्गत नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेच्या २४०२ ग्राहकांकडून २ कोटी २४ लाख ४१,५२० वसूल करायचे आहेत. तर पथदिव्यांच्या ४३३६ वीज जोडण्याकडे ३ कोटी ९२ लाख ९६,७५० रुपयांची थकबाकी आहे. यापैकी वर्धा जिल्ह्यातील ७७५ सार्वजनिक पाणी पुरवठा योजनांकडे १ कोटी ४७ लाख ७४,०७४ रुपयांची थकबाकी आहे. याशिवाय १३५० पथदिव्यांचे १ कोटी ७८ लाख ९६,७९३ रुपयांची थकबाकी आहे. नागपूर ग्रामीण मंडल कार्यालातर्गत १४०९ सार्वजनिक पाणी पुरवठा योजनांकडे ६७ लाख २४,५८३ रुपयांची थकबाकी आहे. तर १३५० पथदिव्यांचे १ कोटी ७८ लाख ९६,७९३ रुपयांची थकबाकी आहे.

भारतीय लष्कराने आपल्या शिस्तीचा परिचय येथे देत शुन्य थकबाकी ठेवली आहे. लष्करासोबतच राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभाग, शहरी विकास मंत्रालय, गृह निर्माण विभाग,आदिवासी विकास विभाग,रोजगार आणि स्वय रोजगार विभागाकडे शून्य थकबाकी आहे.

पाणी पुरवठा योजनेसोबत विविध शासकीय विभागाकडून कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या निवासस्थानांची थकबाकीची रक्कम ७० लाखाच्या घरात गेली आहे. १७,८६७ कर्मचाऱ्यांनी महावितरणची वीज वापरून देयकाची रक्कम अदा केलेली नाही.केंद्र शासनाच्या १६० आस्थापनाकडे सुमारे ३० लाख रुपयांची थकबाकी आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या ११७० वीज जोडण्या असून २ कोटी ११ लाख रुपयांची थकबाकी आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.