সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, February 01, 2018

बजेट २०१८: Live Updates

Image result for जेटली
नवी दिल्ली : मध्यवर्गीय नोकदरांना अर्थसंकल्पातून निराशाच हाती आली आहे. सरकारने इन्कम टॅक्स  स्लॅबमध्ये कोणताही बदल केलेला नाहीये. त्यामुळे इन्कम टॅक्स सूट मिळण्याची मर्यादा ही आधीप्रमाणे २.५ लाख रूपये इतकीच राहणार आहे. तर टॅक्स वाचवण्याची मर्यादा १.५० लाख रूपयेच असेल. इन्कम टॅक्स भरणा-यांची संख्या गेल्या काही काळात वाढली आहे. नोटबंदीमधून साधारण १ हजार कोटी रूपये टॅक्स आला आहे. नोटबंदीनंतर ८५.५१ लाख नवीन टॅक्स भरणारे जोडले गेले आहेत. 

वरिष्ठ नागरिकांना सूट
सरकारने इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल केलेला नाही. सर्वच नोकरदारांचा ४० हजारपर्यंत स्टॅंडर्ड डिडक्शन होणार. वरिष्ठ नागरिकांना बचत रकमेवर व्याजावर ५० हजारांपर्यंत सूट मिळणार आहे. 

कॉर्पोरेट टॅक्समध्ये मोठी सूट
२५० कोटींचा टर्नओव्हर असलेल्या कंपन्यांना आता कमी टॅक्स द्यावा लागले. कॉर्पोरेट टॅक्समध्ये कंपन्यांना मोठी सूट देण्यात आली आहे. अरूण जेटली यांनी घोषणा केली आहे की, २५० कोटी रूपये टर्नओव्हर असलेल्या कंपन्यांना २५ टक्के कॉर्पोरेट टॅक्स द्यावा लागेल. आधी ही सूट ५० कोटी रूपये टर्नओव्हर असलेल्या कंपन्याना दिली जात होती. 

सध्याचा टॅक्स स्लॅब
० ते अडीच लाख – शून्य टक्के
५ लाख ते पाच लाख – ५ टक्के ( तीन हजारांची अतिरिक्त सूट )
५ लाख ते दहा लाख – २० टक्के
१० लाखांपेक्षा जास्त – ३० टक्के
- २०१४-१५ मधील करदात्यांचा आकडा ६.४७ वरुन ८.२७ कोटींवर पोहोचला
- २०१६-१७ या आर्थिक वर्षात ८.२७ कोटी नवीन करदाते वाढले
* नॅशनल हेल्थ पॉलिसी अंतर्गत येणारी 1.5 लाख सेंटर्स लोकांच्या घराजवळ पोहोचवण्याचा प्रयत्न, हे सेंटर्स मोफत तपासणी आणि औषधं देणार , 12 हजार कोटी यासाठी मंजूर - अरुण जेटली
*  प्री-नर्सरी ते बारावीपर्यंतच्या शिक्षणाचं धोरण एकच राहील याची काळजी घेणार.
* 1 लाख कोटी रूपयांचा निधी शिक्षणाच्या क्षेत्रात खर्च करण्याची जेटलींची घोषणा.
* प्राइम मिनिस्टर फेलोशिप योजनेतून 1000 बी.टेक विद्यार्थ्यांची निवड होणार
* शेती आणि संबंधित उद्योगातून जास्तीत जास्त उदरनिर्वाहाची साधन निर्माण करण्यावर सरकारचा भर आहे.
* शिक्षकांचा दर्जा सुधारला तर शिक्षणाचाही दर्जा सुधारेल. शिक्षकांना योग्य प्रशिक्षण देण्याकडे भर. 13 लाख शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम. डिजिटल शिक्षण देण्याची योजना.
* शिक्षणाचा दर्जा अद्यापही चिंतेचा विषय, दर्जेदार शिक्षक असल्यास दर्जा आपोआप सुधारेल - अरुण जेटली
* ग्रामीण भागात जीवनाश्यक वस्तू पोहोचाव्यात यासाठी पुरेपूर प्रयत्न, 14 लाख कोटी खर्च करण्यात येणार - अरुण जेटली.
* पंतप्रधान आवास योजनेतंर्गत 1 कोटी पेक्षा जास्त घरे बांधली जात आहेत.
* प्रधानमंत्री सौभाग्य योजनेतून 4 कोटी घरांना मोफत वीज कनेक्शन देण्याची योजना.
* सहा कोटींपेक्षा जास्त शौचालयं उभारण्यात आली, पुढील वर्षात 2 कोटी शौचालयं उभारण्याचा निर्धार - अरुण जेटली
* गरिबांच्या घरात वीज यावी यासाठी प्रधानमंत्री सौभाग्य योजना सुरु करण्यात आली होती, 4 लाख घरांपर्यंत वीज पोहोचली आहे - अरुण जेटली
* अन्न प्रक्रिया उद्योग वर्षाला 8 टक्क्याच्या वेगाने वाढत आहे, त्यासाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद.
* उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत देशातील 8 करोड महिलांना मोफत गॅस कनेक्शन देणार.
* कृषी क्षेत्रातील पायाभूत सोयी-सुविधांसाठी 22 हजार कोटींची तरतूद.
* 100 बिलियन डॉलरचा शेतमाल सध्या निर्यात केला जातो. त्यासाठी 42 फूडपार्क उभारणार.
* नाबार्डच्या माध्यमातून सूक्ष्म सिंचन सुरू आहे. त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
* मत्स्य शेती आणि पशूसंवर्धन विकासासाठी 10 हजार कोटींची तरतूद.
* 40 मेगा फूड पार्क उभारण्याची योजना.
* अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद - अरुण जेटली
* बांबू शेतीसाठी 1290 कोटी रुपयांची योजना.
* अन्न प्रक्रिया उद्योगासाठी 1400 कोटींची तरतूद करण्याचा सरकारचा निर्णय.
* 585 शेती मार्केटच्या पायाभूत सुविधांसाठी 2 हजार कोटींची तरतूद- अरूण जेटली.
* 470 एपीएमसी बाजारपेठा इंटरनेटने जोडण्यात आल्या आहेत, 585 शेती मार्केटच्या सुधारणांसाठी 2 हजार कोटींची तरतूद.
* विशेष कृषी उत्पादन मॉडेल विकसित करण्याची गरज - अरुण जेटली
* यावर्षी 27.5 मिलियन टन अन्नधांन्याचं उत्पादन घेण्याचं काम शेतकऱ्यांनी केलं आहे - अरूण जेटली.
* शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी योग्य सोई पुरवायला राज्यांबरोबर मिळून आम्ही काम करणार- अरूण जेटली.
* शेतकऱ्यांप्रती कटीबद्ध असलेलं सरकार. 2020पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं मोदी सरकारचं ध्येय- अरूण जेटली.
* ट्रेनच्या तिकिटांपासून ते इतर महत्त्वाची सगळी कागदपत्र ऑनलाईन उपलब्ध- अरूण जेटली.
* कमी किंमतीत जास्त उत्पन्न घेता यावं यासाठी शेतक-यांना मदत करण्याचा प्रयत्न - अरुण जेटली
* शेतकरी कल्याणासाठी आमचे सरकार कटिबद्ध, शेतक-यांचे उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करणार.
* डिजिटलायझेशनला वेग, कागदपत्र आता ऑनलाईन उपलब्ध होतात - अरुण जेटली
* 4 कोटी घरांना वीज पुरवण्याचं काम सध्या सुरु आहे - अरुण जेटली
* गाव-खेड्यांचा विकास करणं हे आमचं लक्ष्य असेल - अरूण जेटली.
 * यावर्षीचा अर्थसंकल्प शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला समर्पित - अरुण जेटली
* मे 2014 मध्ये मोदी सरकार आल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेने चांगली कामगिरी केली. भारताची अर्थव्यवस्था आता जगातील सातवी मोठी अर्थव्यवस्था आहे- अरूण जेटली.
* ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा अर्थसंकल्पातून प्रय़त्न करणार - अरूण जेटली.
* केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली सरकारच्या निर्णयामुळे झालेले सकारात्मक बदल, प्रगती सांगत आहेत.
* पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भारताच्या विकासाला नवी गती मिळाली - अरूण जेटली.
* एकेकाळी देशात भ्रष्टाचार हाच शिष्टाचार झाला होता मात्र आम्ही हे चित्र बदलले- अरुण जेटली
* आमच्या सरकारने सूत्रं हाती घेतल्यापासून अर्थव्यवस्थेत सुधारणा - अरुण जेटली.
* मोदी सरकारने ज्या सुधारणा केल्या त्यामुळे परदेशी गुंतवणूक वाढली.
* सरकारने केलेल्या नव्या नियमांमुळे भारतात व्यवसाय करणं सोपं झालं - अरुण जेटली.
* अर्थमंत्री अरूण जेटली यांनी अर्थसंकल्प सादर करायला केली सुरूवात.
* खा. चिंतामण वनगा यांना लोकसभेत वाहिली श्रद्धांजली.
* इन्कम टॅक्समध्ये सध्या तीन स्लॅब आहेत, अडीच ते पाच लाखादरम्यानच्या वार्षिक उत्पन्नावर 5 टक्के कर आकारला जातो.

जेटलींच्या भाषणातील ठळक मुद्दे -
- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात अनेक मौलिक सुधारणा झाल्या आहेत.
- मोदी सरकारच्या योजनांमुळे परदेशी गुंतवणूक वाढली आहे.
- देशातील तरूण आज इमानदारीने जगत आहे.
- गरिबी दूर करण्यासाठी भारत मजबूत करणार
- भारत जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था
- सरकारच्या सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेमध्ये वेग, आम्ही जीएसटीत अनेक सुधारणा केल्यात
- आमचं सरकार मध्यम वर्गाच्या लोकांचं जगणं सोपं करत आहे.
- सौभाग्य योजनामुळे ४ कोटी घरात वीज पोहोचली आहे.
- आम्ही लोकांना होम लोनमध्ये मोठा दिलासा दिला आहे.
- कृषी उत्पादन रेकॉर्ड ब्रेक होत आहे.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.