खेडुले कुणबी समाज कार्यक्रम
चंद्रपूर/प्रतिनिधी:
समाजाला विकसित करण्यासाठी सर्व समाजबांधवांनी एकत्रित येण्याची
गरज आहे. हळदी कुंकू व वधूवर परिचयासारख्या कार्यक्रमातून दोन कुटुंबे
एकत्र येतात. सामाजिक आपुलकी निर्माण होते. सर्व कुणबीबांधव एका छताखाली
आल्यास कुणबी समाजाचा विकास झपाट्याने होईल, असे प्रतिपादन आमदार नाना
श्यामकुळे यांनी केले.
खेडुले
कुणबी समाजाच्या वतीने सामाजिक भवन सभागृहात हळदीकुंकू, सेवानिवृत्ती
कर्मचाèयांचा सत्कार तसेच वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी उद्घाटक म्हणून आमदार श्यामकुळे बोलत होते. यावेळी खेडुले कुणबी
समाजाचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम सहारे, नरेंद्र गद्रे, मुरलीधर भर्रे,
नंदकिशोर अलोने, प्रकाश बघमारे, संजय बुले, विठ्ठल देशमुख, देवराव माकडे,
सुनील नाकतोडे, अजय बेदरे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनीदेखील यावेळी
आपले विचार मांडले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आसाराम नखाते, दुपारे, अजय
बगमारे, चंद्रकांत शेंडे, नितीन तोंडरे, गुलाब मातेरे यांनी सहकार्य केले.
संचालन इशिका राऊत, तर आभार अनिल ठाकरे यांनी मानले.