সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, February 07, 2018

तहसिल कार्यालयाच्या वरिष्ठ लिपिकास लाच घेतांना रंगेहात अटक

चंद्रपूर/प्रतिनिधी:
कागदपत्रांच्या त्रुटी पूर्ततेसाठी 1000 रुपयाची लाचेची मागणी करणाऱ्या चंद्रपूर येथील तहसिल कार्यालयातील एका वरिष्ठ लिपिक बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर यांनी रंगेहात अटक केली हे.
 बंगाली कॅम्प येथील तक्रारदार याचे घर नगर परिषद चंद्रपूर येथे 2005 मध्ये नजूल जागेत होते रस्त्याच्या कामाकरिता नगरपरिषद चंद्रपूर यांनी सन 2008  मध्ये पडून टाकल्याने तक्रारदाराने राहण्याकरिता सिविल लाइन्स चंद्रपूर परिसरातील एक जागा स्थायी पट्ट्यावर मिळण्याकरिता सन 2010 मध्ये तहसिल कार्यालय चंद्रपूर येथे अर्ज केला होता .सदर प्रकरण तहसीलदार यांनी सही घेऊन मंजुरी करिता उपविभागीय कार्यालयास पाठविलें  आरोपी धनंजय वासुदेव येरणे 50 वर्षे वरिष्ठ लिपिक  कार्यालय चंद्रपूर यांनी तक्रार दाराकडे  फेरफाराची कामाकरिता दोन हजार रुपये लाचेची मागणी केल्याने तक्रारदाराने त्यांची विरुद्ध २४ जानेवारी २०१८  रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती या तक्रारीवरून ७ फरवरी २०१८  रोजी तहसिल कार्यालय चंद्रपूर येथे केलेल्या पडताळणी व सापळा कारवाई दरम्यान आरोपी धनंजय वसुदेव येरणे ५० वर्ष वरिष्ठ लिपिक याला तडजोडीचे १००० रुपये लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर यांनी  रंगेहात अटक केली. येरणे लाचेच्या सापड्यात सापडण्याची माहिती तहसील कार्यालयात पसरताच संपूर्ण तहसिल कार्यालय हादरून गेले होते. सर्वत्र चर्चेला उधाण आले होते. 
सदर कारवाई पोलीस उपायुक्त /पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील ला.प्र.वि. नागपूर तसेच पोलीस उप अधीक्षक डी.एम. घुगे,  ला.प्र.वि.चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे व पुरुषोत्तम चौबे, अजय बागेसर, महेश मांढरे,भास्कर चिंचवलकर, मनोज पिदूरकर, ,राहुल ठाकरे  यांनी पार पडली. 






শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.