ठेकेदाराकडून माॅईल कामगारांचे षोशण,
रामटेक/प्रतिनिधी-रामटेक तालुक्यांतील मनसर माईन येथे माॅईलची अंडरग्राउंड खाण असून येथील 40 कामगारांचे संबधित ठेकेदाराकडून षोशण केले जात असल्याने त्यांनी दिनांक 4 डिसेंबर 2017 पासून संप पुकारला आहे.ठेकेदार नियमाप्रमाणे कामगारांना संबधित रकमेची पावती देतात मात्र त्यांच्या खात्यात पुर्ण रक्कम जमा केली जात नसल्याचा आरोप कामगारांचे नेते भाजयुमोचे तालुका उपाध्यक्ष धर्मेंद्र षुक्ला यांनी पत्रपरीशदेत केला आहे.
याप्रकरणी सविस्तर वृत्त असे की,उपरोक्त माईनमध्ये मे.बी.आर.हुल्डे हे कंत्राटदार आहेत.त्यांचे अधिनस्त सुमारे 40 कर्मचारी असून त्यांना वेतन देणे व त्यांची भविश्य निर्वाह निधीची रक्कम पीएफ कार्यालयांत जमा करण्याची जबाबदारी ही बी.आर.हुल्डे यांची आहे मात्र त्यांनी गेल्या दोन ते तिन वर्शांपासून या 40 कामगारांची पीएफ ची संपुर्ण रक्कम जमा केली नाही.प्रत्यक्षात अतिषय कमी रक्कम त्यांनी जमा केल्याने कामगारांनी त्यांना याबाबत वारंवार विचारण केली मात्र ते ऐकत नसल्याने अखेर कामगारांनी संपावर जाण्याचे षस्त्र उपसले.
ठेकेदार उपरोक्त प्रकारे कामगारांचे षोशण करीत आहेत.एवढेच नव्हे तर वेळेवर कामगारांना वेतन न देणे,नियमानुसार बोनसची रक्कम न देणे व भविश्य निर्वाह निधीची रक्कम वेळेच्या वेळी संबधित कार्यालयांत जमा न करणे यामुळे कामगार बेजार झाले आहेत.माईन प्रबंधक दिलीप डेकाटे यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले की असा प्रकार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.कामगारांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय,अत्याचार आपण खपवून घेणार नाही व त्यांची संपुर्ण रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी आपण लक्ष देवू.
ठेकेदाराकडे काम करणाÚया कामगारांना माॅईलने ओळखपत्र द्यावे व त्यांना त्यांच्या वेतनाची अधिकृत पावती द्यावी कारण कामगारांकडे कुठलाच रेकाॅर्ड राहात नसल्याने त्याला संबधित कंत्राटदार हे माॅईल अधिकारी यांच्याषी संगनमत करून अन्याय करतात.पत्रपरीशदेत सर्वश्री अमोल खोब्रागडे,निखील ठवरे,अमोल कुर्जेकर,विक्रमसिंग बुंदेल,कैलास अडमाची,महेष रौतेल,सागर कठौते,ओमप्रकाष उईके व अन्य कामगार उपस्थित होते.