कोंढाळी - गजेंद्र डोंगरे:-
बुधवार (दि.२९/नोव्हेंबरला) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात
कार्यक्षेत्रातील आरोग्य कर्मचारी,आंगणवाडी सेविका,आशा स्वयंसेविका
यांचेसाठी विशेष प्रशिक्षण सभा नुकतीच संपन्न झाली.
यावेळी प्रमूख पाहूने म्हणून जिल्हा क्षयरोग
अधिकारी डाँ.यशवंत बागडे,तालुका आरोग्य अधिकारी डाँ.मिलींद सोमकुवर,प्रभारी
वैद्यकीय अधिकारी डाँ.सोनाली बाके उपस्थित होते. या कार्यक्रमात
उपस्थितीतांना भारत येत्या २०२५ पर्यंत क्षयमुक्त करण्याबाबत करावयाच्या
कारवाईबाबत विस्तृत माहीती देण्यात आली.
खेड्यापाड्यात येणाऱ्या अडचणीवर
विस्तृत विचार माडण्यात आल्या. तालुका क्षय उपचार पर्यवेक्षक मोहनिस
रेहेकवार यांनी विशेष माहीती यावेळी देण्यात आली. तालुका आरोग्य अधिकारी
डाँ.मिलींद सोमकुवर यांनी प्रधानमंत्री मातृवंदन योजना,कामावर आधारित गट
प्रोत्साहन भत्ता याविषयी माहीती देऊन सर्व कर्मचारी व स्वयंसेविकानी
जास्तीतजास्त काम करुन प्रोत्साहन भत्ता मिळवीण्यासाठी प्रयत्न करावे असे
आव्हान याप्रसंगी केले.प्रभारी वैद्यकीय अधिकारी डाँ.सोनाली बाके यांनी
आर.सी.एच.पोर्टल,एम.सी.टी.एस याविषयी कर्मचाऱ्यांना विस्तारपुर्वक माहीती
दिली.व कामाचा आढावा यावेळी सविस्तर घेण्यात आला.
सभेच्या यशस्वीतेसाठी आरोग्य साय्यक
दिनू गतफने,संजय आमटे,आरोग्य साय्यीका सरस्वती सुरजूसे,आशा गटप्रवर्तक रेखा
भांगे,पुजा खांडेकर, टेक्नीशियल हरीष गावंडे व अन्य सात उपकेंद्रातील
आरोग्य सेवक-सेविका,आंगणवाडी सेविका,आशा स्वयंसेविका,प्राथमिक आरोग्य
केंद्रातील कर्मचारी यावेळी उपस्थित होते.