चंद्रपूर : दिनांक १५ ते १७ डिसेंबर २०१७ रोजी अमरावती येथे होणा-या विदर्भस्तरीय कबड्डी स्पर्धेकरिता न्यू कबड्डी असोसिएशन चंद्रपूर जिल्हयाचा पुरुष व महिलांचा संघ आज जाहीर करण्यात आला आहे. हा पुरुष व महिलांचा संघ राजूर बाजार तालुका वरुड जिल्हा अमरावती येथे होणा-या विदर्भस्तरीय कबड्डी स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. सदर पुरुषांच्या संघात विक्की तुळशीराम पेटकर ( कर्णधार ) धीरजकुमार पाशी ( उपकर्णधार ), सुरज रोडे, सागर अंबाघरे, शुभम गारोडे, संतोष जानवे, अमोल ठेंगणे, राहुल मत्ते, नितीन परचाके, चंद्रकांत वासनिक, सुशांत गुरनुले, विकास निशाद तसेच महिलांच्या संघात भक्ती गोलापल्लीवर ( कर्णधार ), सीमा चौधरी ( उपकर्णधार ), संगीता देबनाथ, अश्विनी आस्वले, पल्लवी घोनमडे, सुजाता मेश्राम, बबली शील, तेजस्विनी कोयचाडे, समीक्षा जुमनाके, सारिका ठाकरे, नितीक्षा प्रधान यांची निवड करण्यात आलेली आहे. पुरुषांच्या संघासाठी प्रशिक्षक म्हणून श्री. शंकर बोरघरे, व व्यवस्थापक म्हणून प्रा. प्रकाश चहांदे त्याचप्रमाणे महिलांच्या संघासाठी प्रशिक्षक म्हणून श्री. मुकेश पांडे तर व्यवस्थापक म्हणून प्रा. सुनिल डाखोळे यांची निवड करण्यात आली आहे.
सदर स्पर्धेच्या यशाबद्दल न्यू कबड्डी असोसीएशन चंद्रपूर जिल्ह्याचे अध्यक्ष अॅड. राहुल घोटेकर, न्यू विदर्भ कबड्डी असोसीएशन नागपूर व चंद्रपूर जिल्ह्याचे सचिव श्री. उमेश पंधरे व कोषाध्यक्ष प्रा. सुनिल डाखोळे यांनी शुभेच्या दिले.