ब्रम्हपुरी / गुलाब ठाकरे
राज्य
सरकारच्या कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम खात्यात अद्याप
जमा न झाल्याने चिंता वाढली आहे. चार महीने उलटला तरी सरकारकडून अद्याप
एकाही पात्र शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळाला नाही. कर्जमाफीची चौकशी करताना राज्य
शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पात्र
शेतकऱ्यांना कजर्मुक्ती ला ग्रहण लागले आहे का असा गहन प्रश्न निर्माण होत
आहे.
कर्जमाफी करण्यासाठी राज्य शासनाने गेल्या चार
महिन्यात राबविलेल्या ऑनलाईन प्रक्रियेत तालुका शेतकऱ्यांनी मुदतीत
कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज भरले आहेत. कर्जमुक्तीचे ऑनलाईन अर्ज भरताना
शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. त्या दिव्यातून शेतकरी
बाहेर पडल्यानंतर तरी किमान कर्जमाफीची गोड बातमी मिळेल अशी अपेक्षा असताना
ती देखील या राजाने दाढी हालवाचे काम करून ही योजना फोल ठरली आहे. आता ही
कर्जमाफी कधी पदरात पडते याची प्रतीक्षा शेतकरी करत आहेत.
सर्वच
नेतेमंडळी उलटसुलट प्रतिक्रिया देत असली तरी प्रत्यक्षात मात्र,
कर्जमाफीच्या कागदपत्रांची पूर्तता आणि त्यासाठी हेलपाटे मारुन बळीराजा
मेटाकुटीला आला आहे. दररोज एक नवीन नियम सांगितला जात असल्याने शेतकरी
कर्जमाफी मिळणार तरी कधी? असा उद्विग्न सवाल करत आहे.
शेतकरी
कर्जमाफीची घोषणा चार महिने झाले. तेव्हापासून राज्य शासनाने लावलेल्या
अटी व शर्तींची पूर्तता करण्यात शेतकरी करत असून सोसायटी, सहकार खाते व
अन्य ठिकाणी हेलपाटे मारुन कागदपत्रांची पूर्तताही केली. मात्र,
प्रत्येकवेळी नवीन नियम आणि कागदपत्रांची मागणी होत असल्याने शेतकरी
पूर्णत: त्रासुन गेला आहे. सहाय्यक निंबधक कार्यालय, जिल्हा बँक किंवा
चावडी वाचनाच्या निमित्ताने यामध्ये सहभागी झालेले तहसीलदारही कर्जमाफीबाबत
काहीही सांगण्यात उत्सुक नाहीत.शासनाने
कर्जमाफीच्या अर्जात कोणी ग्रा. पं. सदस्य, सोसायटी संचालक, चेअरमन, सरपंच
आहे का अशी विचारणा करणारा नवा खलीता पाठवून संपूर्ण याद्या पुन्हा
तपासणीच्या सूचना दिल्या आहेत. या नव्या निकषात ही कर्जमाफी पुन्हा
अडकल्याचे स्पष्ट झाले आहे. कर्जमाफी नक्की मिळणार तरी आहे का? असा सवाल
तालुक्यातील शेतककरी करत आहेत.
कागदपत्रांची
पूर्तता केल्यानंतर त्याला दीड लाखाची कर्जमाफी अपेक्षशेतकरी कर्जमाफीकडे
डोळे लावून बसला असताना शासनाने तातडीने तांत्रिक अडचणी दूर करून
शेतकर्यांना दिलासा केव्हा मिळणार की ""राजा बोले दाढी हाले "" असा पेच
शेतकऱ्यांना पडत आह.