चिमूर तालुका प्रतिनिधी:
धरणे आंदोलनात समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी स्वतंत्र मातीकला बोर्ड स्थापन करणे, कुंभार समाजातील विट, मडकी व मूर्ती व्यवसायाकरिता अस्तित्वात असलेल्या कुंभारखाणी समाजाला देणे, कुंभार समाजाला भटक्या विमुक्त जमाती प्रवर्गात समावेश करणे, कुंभार समाजाला विधानपरिषदेमध्ये प्रतिनिधीत्व द्यावे, मातीवरील रॉयल्टी माफीबाबतचे व समाजातील वीट व्यावसायिकांना आवश्यक परवाने बाबतचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी व तहसीलदारांना देण्यात यावे, समाजातील ५० वर्षावरील निवृत्त कारागीरांना ३ हजार रुपये मानधन देण्यात यावे, एमआयडीसी क्षेत्रामध्ये कुंभार व्यावसायिकांना अग्रक्रमाने जागा देण्यात यावी, प्लॉस्टर ऑफ पॅरीसच्या मूर्ती बनविणे आणि विक्रीवर बंदी करण्यात यावी, मडकी भाजण्याकरिता लागणारे सरपण, जळावू बीट चंद्रपूर जिल्ह्याप्रमाणे ३०० रुपयात देण्यात यावे, वीट, मडकी व मूर्ती व्यवस्थापनासाठी अग्रक्रमाने शासकीय जागा उपलब्ध करून द्यावी, संत शिरोमणी गोरोबा काका यांचे जन्मगाव तेर येथे विस्तृत विकास आराखडा तयार करून 'तेर'चा सर्वांगीण विकास करण्यात यावा व तेर तीर्थक्षेत्रास 'अ' दर्जा देण्यात यावा आदी मागण्या करण्यात येणार आहेत. तरी समाजबांधवांनी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होऊन शक्तीप्रदर्शन करावे, असे आवाहन कुंभार समाज महांसघाचे चिमूर तालुका अध्यक्ष गणपत खोबरे यांनी केले आहे .