देसाईगंज / प्रतिनिधी - येथिल राजेंद्गवार्डातील सागर व्यंकटराव भांडारकर वय ३५ वर्ष यांचे सिकलसेल या आनुवांषिक तथा कधीही बरा न होणार्या धुरंधर आजाराने रात्री निधन झाले आहे.
अतिदुर्गम,आदीवासीबहूल गडचिरोली जिल्ह्यात एकुण लोकसंख्येच्या १७ टक्के रुग्ण सिकलसेल या आनुवांषिक तथा कधीही बरा न होणार्या धुरंधर आजाराने ग्रासले असल्याचा अनुमान गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत स्वंयसेवी संस्था सर्च ,बि.जे.मेडीकल कॉलेज पुणे,व इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज यांनी संयुक्तपणे गडचिरोली जिल्ह्याील आजाराबाबत सन १९८८ -८९ ला संशोधन करून धक्कादायक अहवाल दिला होता .
आता सिकलसेल या आनुवांषिक आजाराला राष्ट्रीय कार्यक्रमात समावेश करण्यात आले असुन राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात करोडो रुपये खर्च केल्या जात आहे.मात्र अद्याप गडचिरोली या अतिदुर्गम व आदीवालीबहुल जिल्ह्यात सिकलसेल या आनुवांषिक तथा कधीही बरा न होणार्या धुरंधर आजाराने किती रुग्ण ग्रासले आहेत ही आकडेवारी गुलदस्त्यातच आहे *****