चंद्रपुर/प्रतिनिधी:
गेल्या दीड वर्षांपासून शहरातील रस्त्यावरील खड्ड्यां संदर्भात सतत पाठपुरावा करूनही प्रशासनाला जाग न आल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे रस्त्यावरील जीवघेन्या खड्ड्यांची विधिवत पूजा करून सुस्त सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्यासाठी सदर अभिनव आंदोलन करण्यात आले. एवढ्यावरच न थांबता मनसेने आक्रमक भूमिका घेत अधीक्षक अभियंता यांच्या कार्यलयात पदाधिकारी व कार्यकर्ता समवेत सरळ धडक देऊन अभियंताला घेराव केला. वारंवार पाठपुरावा करूनही रस्त्यावरील खड्ड्यांची कायमस्वरुपी उपाय का करण्यात येत नाही, दोषी कंत्राटदारावर कारवाई का केली नाही. ना ना तऱ्हेच्या प्रश्नाचा भडीमार करत अधीक्षक अभियंताना जाब विचारल तसेच *मुरूम व गिट्टी* अधीक्षक अभियंत्यांच्या टेबल वर ठेऊन त्यांना खड्डे बुजविण्यासाठी भेट दिली.यानंतर कोणताही अपघात रस्त्यामुळे झाल्यास संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्य वधाचे गुन्हे दाखल करू यासंबंधीचे एक स्मरणपत्र त्यांना दिले.
यावेळी अधीक्षक अभियंता नि खड्याची जबाबदारी स्वीकारत लवकरात लवकर खड्डे बुजविण्याचे ठोस आश्वसंन दिले. तसेच मनसे पदाधिकारी व कार्यकारी अभियंता यांची कमिटी नेमून पुढील रस्ते बुजविण्याचे कारवाई करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी संपूर्ण मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक भूमिकेत होते.स्तुस्त प्रशासनाचा निषेध यांच्यावतीने करण्यात आला. यावेळी रस्ते दुरुस्तीकरिता मनसेतर्फे १५ दिवसाचे अलटीमेंटम देण्यात आले.
सदर आंदोलन जिल्हाध्यक्ष दिलीप भाऊ रामेडवार यांच्या मार्गदर्शनात व मनवीसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांच्या नेतृत्वात घेण्यात आले. यावेळी जिल्हाउपाध्यक्ष सचिन भोयर, महिलासेना जिल्हाध्यक्ष सुनीता गायकवाड मनवीसे जिल्हाउपाध्यक्ष शैलेश केळझरकर, जिल्हासंघटक कुलदीप चंदनखेडे, ग्रामपंचायत सदस्य विवेक धोटे, तालुकाध्यक्ष प्रकाश नागरकर, शहर उपाध्यक्ष सचिन कोतपल्लीवार, भरत गुप्ता, मनोज तांबेकर, महेश शास्त्रकार, बुद्धप्रकाश ठमके, मनवीसे शहर उपाध्यक्ष नितेश जुमडे,संजय भारदे,अतुल ताजने, नितीन टेकाम, स्वप्नील राठोड, राकेश पारडकर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.