भटिंडा - बुधवारी सकाळी धुक्यामुळे गाड्या एकमेकांना धडकून झालेल्या अपघातात 10 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपघाताच्या वेळी कॉलेज स्टूडंट बसची वाट पाहत होते. त्याचवेळी डंपरने त्यांना चिरडले. विद्यार्थ्यांचा जागेवरच मृत्यू झाला. 17 जण गंभीररित्या जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच 6 अॅम्ब्युलन्स घटनास्थली पोहोचल्या. त्यांनी 11 जखमींना खासगी रुग्णालयात तर 5 जणांना भटिंडा सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
पंजाब सरकारने दिली 1-1 लाखांची मदत
- भटिंडाचे उपायुक्त दीप्रवा लाकरा म्हणाले, पंजाब सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना 1-1 लाख आणि जखमींना 50 हजारांची नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे.
- लाकरा यांनी दहा जण ठार झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
- पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी ट्वीट करत म्हटले की, याबाबत मंत्री आणि भटिंडाचे आमदार मनप्रित बादल यांच्याशीही चर्चा केली आहे. बादल यांना मदतकार्यावर नियंत्रण ठेवण्यास सांगितले आहे.
असा झाला अपघात..
- प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी 8 वाजेच्या सुमारास 13 विद्यार्थी रस्त्याच्या किनाऱ्यावर बसची वाट पाहत होते. त्याचवेळी एक भरधाव डंपर त्यांच्या दिशेने येत असल्याचे त्यांनी पाहिले. त्यांनी हात दाखवत डंपर थांबवण्याचा प्रयत्न केला पण धुक्यामुळे ड्रायव्हरला काहीही दिसले नाही, त्यामुळे चिरडल्याने घटनास्थळीच 10 जणांचा मृत्यू झाला.
- त्यानंतर धुक्याचे प्रमाण जास्त असल्याने एकापाठोपाठ एक 35-36 गाड्या अपसांत धडकल्या.
अपघातानंतर प्रशासनाने बदलल्या शाळेच्या वेळा..
- गेल्या तीन-चार दिवसांपासून पडणारी कडाक्याची थंडी आणि धुक्याचे प्रमाण वाढूनही प्रशासनाने काहीही पावले उचलली नव्हती. पण आता या अपघातानंतर शाळांचा वेळ बदलण्याची घोषणा करण्यात आली आहे.
- भटिंडा जिल्ह्यात आता शाळा सकाळी 9 ते दुपारी अडिचपर्यंत भरणार आहेत. बुधवारपर्यंत सकाळी 8 वाजता शाळा होती.