चंद्रपूर - गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत आंतर महाविद्यालयीन तायक्वांडो ( मुली ) स्पर्धेत राष्ट्रीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय विसापूरची खेळाडूनी ५३ किलो वजन गटात सुवर्ण पद पटकावून विद्यापीठात आपले प्रथम स्थान निश्चित केलेले आहे. नुकताच पार पडलेल्या तायक्वांडो ( मुली ) स्पर्धेचे आयोजन निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालय भद्रावती यांच्या इंदोर स्टेडीयममध्ये घेण्यात आले होते. या स्पर्धेत खेळाडूना प्रशिक्षक व मार्गदर्शक म्हणून प्रा. विक्की पेटकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले होते. सदर स्पर्धेत अवंतिका गांगरेड्डीवार हिने ५३ किलो वजन गटात सुवर्ण पदक पटकविले. या यशाबद्दल खेळाडूंचा महाविद्यालयात प्राचार्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे.
या संघाच्या यशाबद्दल राष्ट्रीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय विसापूरचे प्राचार्य डॉ. दिलीप टिकाराम जयस्वाल शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा. विक्की तुळशीराम पेटकर तसेच इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी कौतुक केले.