সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, November 03, 2017

उपराजधानीतील तक्रारी आता 'सिटीजन पोर्टल' वर

नागपूर - उपराजधानीतील नागरिकांना आता आजपासून कोणत्याही पोलीस ठाण्यात ऑनलाईन तक्रार नोंदवता येणार आहे. शहरवासियांसाठी ऑनलाईन तक्रारी नोंदविण्याच्या हेतूने शहर पोलीस विभागाने 'सिटीजन पोर्टल' सुरू केले आहे. त्यामुळे आता ठाण्यात जाण्याऐवजी वेबसाईटद्वारेच नागपूरकर तक्रारी देतील. या पोर्टलचा शुभारंभ पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी केला.
http://nagpurpolice.gov.in/index



पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम म्हणाले, यापूर्वी सामन्य जनताही नियंत्रण कक्षाला माहिती देऊन किंवा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवत होते. त्यामुळे महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना बराच त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होत होती. ही गैरसोय टाळण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलमध्ये घरबसल्या विविध तक्रारी करण्यात येतील. तक्रारीत संबंधित पोलीस ठाणे, झोन किंवा परिसराचा उल्लेख असावा. पोर्टलवर आलेली तक्रार संबंधित पोलीस ठाण्याला पाठविण्यात येईल. तक्रार दखल घेण्याजोगी असल्यास तक्रारदाराला त्या-त्या पोलीस ठाण्यात बोलविण्यात येईल. संपूर्ण राज्यात हे पोर्टल सुरू झाल्याचे पुढे त्यांनी सांगितले.


पोर्टलवर आलेल्या तक्रारी शहर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त आणि त्यांचे सहकारी हाताळतील. पोर्टलवर तक्रार केल्यास लगेच तक्रारदाराला कुठल्या पोलीस ठाण्याला तुमची तक्रार गेली, हे सांगण्यात येईल. त्याचप्रमाणे तपास अधिकारी कोण आहेत, याचीही माहिती देण्यात येईल. संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार गेल्यानंतर ८ दिवसात त्यावर कारवाई करण्यात येईल. तक्रारीची दखल न घेणार्‍या पोलीस अधिकार्‍यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

कामठी येथील सृजल वासनिक या मुलाचे अपहरण होऊन दीड महिना झाला. तरी, त्याचा पोलिसांना शोध लावता आला नाही. त्यावर बोलताना गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम यांनी प्रकरणाचा कामठी पोलीस आणि गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरू असल्याची माहिती दिली. मुन्ना यादव संबंधाने विचारलेल्या अनेक प्रश्नांचे उत्तर देताना पोलीस आयुक्तांनी चौकशी सुरू असल्याचे सांगितले. यावेळी सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे आणि पोलीस उपायुक्त संभाजी कदम उपस्थित होते. 

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.