সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, November 09, 2017

बल्लारपुरात कांग्रेस कमेटीने पाडला काळा दिवस

बल्लारपूर/प्रतिनिधी :
वर्षभरापुर्वी केन्द्रातल्या नरेंद्र मोदी सरकारने 8 नोव्हेम्बर या दिवशी 500 व 1000 रु चे चलन   रात्री 12 वा पासून रद्द केले होते काळा पैसा व भ्रष्टाचार या पासून देश मुक्त होईल व अर्थव्यवस्था मजबूत होईल असा
केंद्र सरकारचा तर्क होता. मात्र देशातील प्रमुख विरोधी पक्ष कांग्रेस व इतर विरोधी पक्षानी 8 नोव्हेम्बर हा काळा दिवस म्हणून पाडला संपूर्ण महाराष्ट्रासह चंद्रपुर  जिल्हाभर व बल्लारपुर शहरात कांग्रेस पक्षानी धरने आंदोलन केले असून तीव्र निषेध नोंदविला या प्रसंगी बल्लारपुर शहरातील नगर परिषद समोरील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील सकाळी 12.00 वा धरणे आन्दोलनाला सुरवात झाली यात अनेक नेत्यांनी मार्गदर्शन करतांना केंद्र सरकारच्या नोट बंदी केल्यामुळे सामान्य नागरिकांना कोणत्या संकटाला सामोरे जावे लागले, त्याचप्रमाणे या नोटबंदि केल्यामुळे या रद्द झालेल्या नोटा बदलण्यासाठी रांगेत लागलेल्या सुमारे 100 नागरिकाचा जीव तर गेलाच शिवाय अतिरिक्त कामाच्या तानामुळे काही बैंक कर्मचाऱ्याचा ही जीव गेला या सर्व जीविताची जबाबदारी केंद्र सरकार ची आहे असे मत अनेक नेत्यांनी व्यक्त केले याशिवाय या नोट बंदी मुळे अनेकांना समस्येचा सामना करावा लागल्याची भावनाही व्यक्त केली यामुळे लघु उद्योगावर मोठा परिणाम झाला असल्याने अनेकांना बेरोजगार व्हावे लागले. सदर धरणे आंदोलनात कांग्रेसचे अनेक नेते विचार पीठावर होते यात प्रामुख्याने माजी नगराध्यक्ष श्री घनश्याम मूलचंदानी, दिलीपभाऊ माकोड़े, कांग्रेस चे माजी गट नेते देवेंद्र आर्य, डॉ. सुनील कुल्दीवार , शेख रेहमानजी, अनिल खरतड, नगर सेवक म्हणून अमित पाझारे, सचिन जाधव ई ची प्रामुख्याने उपस्थिति होती सदर धरणे आन्दोलना नंतर विविध मागण्याचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात येवून या आन्दोलनाची सांगता झाली.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.