সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, February 14, 2018

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राद्वारे विद्यार्थ्यांना करिअर घडविण्याची संधी:प्रो.श्रीनिवास वरखेडी

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयात स्पर्धा परीक्षा 
मार्गदर्शन केंद्रांतर्गत वाचन कक्षाचे उद्घाटन आणि परिसंवादाचे आयोजन

रामटेक/प्रतिनिधी:
कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या वाचन कक्षाचे उद्घाटन आणि मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने ‘स्पर्धा परीक्षेत मराठीचे योगदान‘ या विषयावर विश्वविद्यालयाच्या अतिथीगृह सभागृहामध्ये परिसंवादाचे आयोजन आज बुधवार दि. 14.02.2018 रोजी सकाळी 10.30 वाजता करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. कुलगुरू प्रो. श्रीनिवास वरखेडी होते. व्यासपीठावर प्रमुख वक्ते म्हणून वसंतराव कला व विज्ञान संस्थेतील माजी मराठी विभाग प्रमुख डॉ. लता लांजेवार, व्हीएनआयटी चे समाजशास्त्राचे प्राध्यापक डॉ. गोपीचंद निंबार्ते, कुलसचिव डॉ. अरविंद जोशी, शिक्षणशास्त्रा संकायाच्या अधिष्ठाता आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या अध्यक्षा डॉ. ललिता चंद्रात्रो उपस्थित
होत्या.
 कार्यक्रमाचा प्रारंभ श्री. श्रीपाद अभ्यंकर यांनी गायिलेल्या सरस्वती स्तवनाने झाला. प्रास्ताविक केंद्राध्यक्षा डॉ. ललिता चंद्रात्रो यांनी केले. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या वाचन कक्षाचे उद्घाटन वसंतराव नाईक कला व विज्ञान संस्थेतील माजी मराठी विभाग प्रमुख डॉ. लता लांजेवार यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी मा. कुलगुरू प्रो. श्रीनिवास वरखेडी, कुलसचिव डॉ. अरविंद जोशी, केंद्राच्या अध्यक्ष आणि शिक्षणशास्त्रा संकायाच्या अधिष्ठाता डॉ. ललिता चंद्रात्रो, वित्त व लेखा अधिकारी डॉ. रामचंद्र जोशी, ग्रंथपाल डॉ. दीपक कापडे, डॉ. रोशन अलोणे, श्री. सुमीत कठाळे, श्री. राजीवरंजन मिश्रा, श्री. प्रवीण कळंबे उपस्थित होते. या केंद्रा अंतर्गतयु.पी.एस.सी./एम.पी.एस.सी./बॅंक/एल.आय.सी/नेट/सेट/तहसीलदार/तलाठी/ ग्रामसेवक/ पोलीस भरती इ. स्पर्धा परीक्षांचे निवासी मार्गदर्शन वर्ग वेळोवेळी घेण्यात येणार आहेत. नेट/सेट च्या तयारीसाठी दि.23एप्रिल ते 15 मे 2018 या कालावधीत निवासी वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी विश्वविद्यालयाचे ग्रंथालय, वाचनकक्षामध्ये इंटरनेट सुविधा तसेच सर्व स्पर्धा परीक्षांचे ग्रंथ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच परीक्षांसंदर्भात मार्गदर्शनासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक, विश्वविद्यालयाचे अनुभवी प्राध्यापक यांचे मार्गदर्शन वेळोवेळी प्राप्त होणार आहे. याशिवाय प्रत्येक विषयानुसार सराव परीक्षा, ऑनलाईन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा, टेस्ट सिरीज, वातानुकुलित वाचनकक्ष, ग्रंथ व नियतकालिक सुविधा सर्व विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
                                                      मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कात विशेष सुट देण्यात येणार आहे. याप्रसंगी कुलसचिव डॉ. अरविंद जोशी यांनी हे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र हे रामटेकमधील विद्यार्थ्यांसाठी स्वतःचे करिअर घडविण्याची उत्तम संधी असून डॉ. लांजेवार आणि डॉ. निंबार्ते हे या क्षेत्रातील आदर्श असून त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ येथील युवा विद्यार्थ्यांना मिळावा या हेतूने या परिसंवादाचे आयोजन केल्याचे सांगितले.कुलगुरू प्रो. वरखेडी आपल्या भाषणात म्हणाले, ‘‘हे स्पर्धा परीक्षा केंद्र म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी स्वतःचे करिअर घडविण्याची संधी आहे. विद्यापीठातून केवळ पदवी घेऊन आता भागणार नसून ज्ञानासोबत कौशल्यविकासाची जोड मिळाली तरच बाहेरच्या जगात,उद्योगक्षेत्रात विविध विकासाच्या संधी विद्यार्थ्यांना प्राप्त होतील. विद्यापीठाची यासंदर्भात मोठी जवाबदारी आहे हे संस्कृत विद्यापीठाने जाणून या केंद्राद्वारे विविध स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 
                                                                 सर्वांना विकासाची समान संधी मिळाली पाहिजे, ती मिळाली तर कोणताही सामान्य माणूस स्वतःच्या कष्टाने आणि गुणांनी सर्वोच्च पदी विराजमान होऊ शकतो हे भारताने विविध नामांकित उदाहरणांनी सिद्ध केले आहे. म्हणूनच रामटेक आणि आसपासच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी संस्कृत विद्यापीठ कटिबद्ध असून त्यासाठी उचलेलेले हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या विद्यापीठात आलेला प्रत्येक विद्यार्थी हा संस्कृत भाषेचा परिमल घेऊनच बाहेर पडेल, असा विश्वास व्यक्त करून आर्थिकदृष्टया दुर्बल असलेल्या विद्यार्थ्याना विद्यापीठ मदत करेल असे आश्वासनही याप्रसंगी मा. कुलगुरू महोदयांनी दिले. ’’कार्यक्रमाचे संचालन श्री. सुमीत कठाळे यांनी केले तर आभार डॉ. दीपक कापडे यांनी मानले. विश्वविद्यालयाशी संलग्नित विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी, प्राध्यापक, प्राचार्य, रामटेकमधील पत्राकार, विश्वविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी, कार्यालयीन सहकारी याप्रसंगी उपस्थित होते. स्पर्धा परीक्षेत मराठीचे योगदान या विषयावरील परिसंवादात डॉ. गोपीचंद निंबार्ते, प्राध्यापक .एन.आय.टी. नागपूर आणि डॉ. लता लांजेवार, माजी प्राचार्य, अॅडमिनीस्टंेटीव्ह डिग्री कॉलेज, महाल नागपूर यांचे अनुभवपूर्ण मार्गदर्शन प्राप्त झाले. या स्पर्धा मार्गदर्शन केंद्राच्या उभारणीसाठी तसेच कार्यक्रम यशस्वितेसाठी समिती सदस्य डॉ. दीपक कापडे, डॉ. रोशन अलोणे, श्री सुमती कठाळे यांच्यासह श्री. राजीव रंजन मिश्रा, श्री. प्रवीण कळंबे, ग्रंथालयातील सहकारी तसेच विश्वविद्यालयातील कार्यालयीन सहका-यांचे साहाय लाभले.




শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.