पिपर्डा गावात स्वच्छता महोत्सव साजरा
चंद्रपुर(प्रतिनिधी)दिनांक- 31/12/2017 गावाचा ख-या अर्थाने विकास करायचा असेल तर, गावातील लहान मुल उद्याचे भावी नागरिक होणार आहे. यांना सर्वांगाने सक्षम केल्यास गावांचा सर्वांगाने विकास करता येतो . असे प्रतिपादन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी कोरपना तालुक्यातील पिपर्डा गावात आयोजित स्वच्छता महोत्सव कार्यक्रमात व्यक्त केले.
स्वच्छता महोत्सवाचे प्रास्ताविक कोरपना पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी धनंजय साळवे यांनी केले. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार ॲड. संजय धोटे,कार्यक्रमाचे उदघाटक म्हणुन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर,प्रमुख अतिथी म्हणुन जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) रविंद्र मोहिते ,सामाजिक कार्यकर्ता सय्यद आबिद अली प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर पुढे बोलतांना म्हणाले की, मुलांचा विकास करावयाचा असेल तर स्वच्छतेच्या सवयीसह कुपोषणमुक्त ग्राम होणे गरजेचे आहे. यासोबतच स्पर्धेच्या युगात गावातील तरुण समोर येण्या साठी तरुणांनी वाचणाची सवय लावली पाहिजे. वाईट व्यसना पासुन दुर राहिले पाहिजे. उल्वल जीवन घडविण्यासाठी लहान पणा पासुनच चांगल्या सवयीचा स्विकार केला पाहिजे. पिपर्डा गावातील शाश्वत स्वच्छता ,गुडमार्निंग पथक सह गावात राबविलेल्या सर्व उपक्रमांचे मनापासुन कौतुक करतो .असे मत व्यक्त केले. राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार ॲड. संजय धोटे यांनी जीवनमान उंचावण्या करीता सर्वांनी स्वच्छता राखणे गरजेचे आहे. हे सर्व गावांनी ठरविले तेव्हाच घडुन येते. अशाप्रकारचा आदर्श पिपर्डा ग्रामस्थांनी दाखवुन दिला आहे. गावाची ताकद सर्वात मोठी असुन, गावक-यांनी एकत्र येवुन केलेला प्रत्येक संकल्प हा पुर्णत्वास जातो असे मत व्यक्त केले. जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) रविंद्र मोहिते यांनी एकत्र येवुन गावाला आदर्शवत करणारे सर्व ग्रामस्थ गावविकासाची प्रमुख भुमिका पार पाडत असुन, सकारात्मक दृष्टीने सर्वांनी विचार केल्यामुळेच आज गावात शाश्वत स्वच्छता निर्माण झाली आहे. असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाला प्रामुख्याने नायब तहसिलदार मडावी, कृषी अधिकारी देवनाडे, स्वच्छ भारत मिशनचे माहिती शिक्षण संवाद तज्ञ कृष्णकांत खानझोडे, पिपर्डा ग्रामपंचायतचे सरपंच चंद्रभान मडावी, धानोली ग्रामपंचायतचे सरपंच विजय रणदिवे, विस्तार अधिकारी जिवन प्रधाण, प्रविण मस्के, खुशाल राठोड, कोरपना नगरपंचायतचे नगरसेवक सोयल अली, रमेश पाटिल मालेकर तथा गावातील व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते..
कार्यक्रमात गावात शाश्वत स्वच्छता राखणारे जेष्ठ नागरिकांचा व गुडमोर्णिंग पथक उपक्रम राबविणा-या तरुणांचा भव्य सत्कार करण्यात आला. शादीखाना सभागृह, प्रधानमंत्री आवास योजनेचे भुमिपुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे यशस्वी सुत्रसंचालन व आभारप्रदर्शन पिपर्डा गावचे सामाजिक कार्यकर्ता सय्यद आबिद अली यांनी केले.
Sunday, December 31, 2017
कृषीपंप धारकाचे तक्रार निवारण जन संपर्क कार्यक्रम संपन्न
दुर्गा मेश्राम हत्या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन
प्रमोदभाऊ चिमुरकर यांचे कडून दुमाने कुटुंबाला आर्थिक मदत
संविधान बदलण्याच्या केलेल्या वक्तव्यावर बीआरएसपी ने केला जाहीर निषेध
अखेर त्या रुग्णाचा मृत्यू
जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस शिक्षा
विनयभंग करणाऱ्या आरोपीस शिक्षा
जबरी संभोग करणाऱ्या आरोपीस शिक्षा
Saturday, December 30, 2017
प. पु. सदगुरू दादाश्री महाराजांचा मुक्तेश्वरी गुरुपीठाचे उत्तराधिकारी
* ह.भ.प सुभाष महाराज बावनकर यांच्या हस्ते विधीवत पार पडला
* आमदार बाळु धानोरकर यांची प्रामुख्याने उपस्थिती
चंद्रपूर दि.३० (प्रतिनिधी):
सत्संगाच्या माध्यमातून सामाजिक क्रांती घडविणारे सिद्धमहायोगी शक्तीपाताचार्य प. पु. सदगुरू प्रियानंद महाराजांचा सोळाष्टी सोहळा तसेच त्यांचे सुपुत्र प. पु. सदगुरू दादाश्री महाराज यांचा उत्तराधिकारी सोहळा मुक्तेश्वरी गुरुपीठ निमगाव, वर्धा येथे २८ डिसेंबर २०१७ रोजी ह.भ.प सुभाष महाराज बावनकर यांच्या हस्ते विधीवत पार पडला असुन यावेळी भद्रावती वरोरा विधानसभा क्षेत्राचे आमदार बाळु धानोरकर यांची प्रा‘ुख्याने उपस्थिती होती.
भगवान नित्यानंद बाबांचे कृपाधिष्टीत तसेच सिद्ध परंपरेतील महान संत, शक्तिपात, ध्यानसाधना, व सिद्धयोगाची दीक्षा तसेच सत्संगाच्या माध्यमातून सामाजिक क्रांती घडविणारे सिद्धमहायोगी शक्तीपाताचार्य प. पु. सदगुरू प्रियानंद महाराज १३ डिसेंबर २०१७ रोजी ब्रम्हलीन झाले, त्या पाश्र्वभूमीवर २८ डिसेंबर २०१७ रोजी प. पु. सदगुरू प्रियानंद महाराजांचा सोळाष्टी सोहळा तसेच त्यांचे सुपुत्र प. पु. सदगुरू दादाश्री महाराज यांचा उत्तराधिकारी सोहळा मुक्तेश्वरी गुरुपीठ निमगाव, वर्धा येथे संपन्न झाला.
सोहळ्याची सुरुवात दादाश्रींच्या मंगलंमयस्नानाने झाली, त्यावेळी साधनरत असलेल्या सोळा ब्राम्हणांचा यथोचित सत्कार करून, दादाश्रींनी प. पु. सदगुरुंच्या समाधीचे तसेच सदगुरूंच्या आणि भगवान नित्यानंद बाबांच्या पादुकांचे पूजन केले.तर प्रतिभाताई घोंगे यांनी दादाश्री महाराजांच्या पादुकांचे पूजन केले.उपस्थित ब्राम्हणांच्या वतीने महामंत्राचा जयघोष, वेदपठण,तसेच गायत्री मंत्रजप करण्यात आले.
ह.भ.प सुभाष महाराज बावनकर यांच्या हस्ते उत्तराधिकारी सोहळा विधीवत पार पडला. तसेच गुरुपीठातील ज्येष्ठ साधक रविंद्र इंगोले आणि समीर शेंडे यांच्या हस्ते दादाश्रीना पवित्र आसनावर विराजमान करून एकवीस साधकांच्या वतीने दादाश्रींचे माल्यार्पण करण्यात आले. या सर्व विधीनंतर दादाश्रींना मुक्तेश्वरी गुरुपीठातील सर्व साधकांच्या वतीने पदभार सोपविण्यात आला त्याचबरोबर सर्व साधकांच्या वतीने प. पु. सदगुरू दादाश्री महाराज असे नामकरण करण्यात आले. मुक्तेश्वरी गुरुपीठावर यापुढे शक्तिपात दीक्षेचा प्रचार, प्रसाराचे कार्य दादाश्री महाराजांच्या आज्ञेनुसार पार पडेल असे सर्वानुमते ठरविण्यात आले.
यावेळी आ. बाळु धानोरकरसह हजारोंच्या संख्येने साधक वर्ग उपस्थित होता.
ब्रेकिंग बातमी
ट्रकने १२ वर्षिय तरुणाला चिरडले
रामटेक तालुक्यातील भांडार बोडी येथील घटना नंदू तरारे असे नाव आहे
http://kavyashilpnews.blogspot.com
अमोल कोंडबतुनवार यांचे निधन
आज पिपर्डा येथे स्वच्छता महोत्सव
चंद्रपूर (प्रतिनिधी) - मागील वर्षापासून ग्रामस्थांच्या सहभागातून वर्षाच्या अखेर विविध ग्रामविकासाच्या कामातून करण्याचा निर्धार कोरपना तालुक्यातील पिपर्डा येथील ग्रामस्थांनी केलेला आहे. यावर्षी सुध्दा पिपर्डा येथील सामाजिक कार्यकर्ते आबीद अली यांच्या मार्गदर्शना खाली ग्रामस्थांनी दिनांक 30 डिसेंबर 2017 रोजी संध्याकाळी ठिक 7.00 वाजता गावात भव्य स्वच्छता महोत्सवाचे आयोजन केलेले आहे.
पिपर्डा येथील आयोजित स्वच्छता महोत्सवास अध्यक्ष म्हणून राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार ॲङ संजय धोटे, कार्यक्रमाचे प्रमुख उदघाटक म्हणून जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदचे अध्यक्ष देवराव भोंगळे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) रविंद्र मोहिते, राजुराचे उपविभागीय अधिकारी दयानिधी, कोरपना तहसिलदार हरीश गाडे, पंचायत समिती कोरपनाचे गट विकास अधिकारी डॉ. संदिप घोन्सीकर, तालुका कृषी अधिकारी वानखेडे, पोलीस निरिक्षक परघने कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रम दरम्यान ग्रामस्थांना ग्रामविकासावर मार्गदर्शन केले जाणार असून, मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपन, शादीखाना सभागृहाचे भूमिपूजन, सिमेंट रस्ता कामाचे भूमिपूजन, प्रधानमंत्री व रमाई आवास योजना घरकूल कामाचे भूमिपूजन, गोमाता पूजन, पंडित दिनदयाल उपाध्याय वाचनालय लोकार्पण, ग्रामस्वच्छतेत योगदान दिलेल्या जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात येणार येत असल्याचे पिपर्डा ग्रामपंचायतीचे सरपंच चंद्रभान तोडासे, सामाजिक कार्यकर्ता आबीद अली यांनी कळविले आहे.
Friday, December 29, 2017
अपघातात वाघ ठार
गोंडखैरी परिसरात दोन अपघात..! जिवीतहानी नाही....!
बाजारगाव
- राष्ट्रीय अमरावती-नागपूर महामार्गावर टोलटँक्स येथे महाराष्ट्रराज्य परिवहन महामंडळाची गणेशपेठ डेपोची शिवशाही बस-ट्रक अपघात.तसेच येथून जवळच असलेल्या कळमेश्वर वळन रस्त्यावर दोन ट्रेलर-ट्रक चा अपघात.
येथून जवळच गोंडखैरी येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात तिन ट्रक व एक शिवशाही बसची मोठी हानी झाली. पहिला अपघात गोंडखैरी ते कळमेश्वर वळन रस्त्यावर गुरुवार (दि.२८/डिसेंबर सकाळी साडे नऊ) च्या सुमारास टिनूप लाँजिस्टीक पार्क सामोर सिताराम रोडलाईन्सचा ट्रक क्रंमाक एमएच-३१-एपी-२१४० तर लोखंडी पाईप भरलेला ट्रेलर क्रंमाक जिजे-१६-डब्ल्यु-१२५० यांची अमोरासमोर जोरदार धडक झाली असता कोणतिही जिवीतहानी न होता अपघात घडला.या अपघातात ट्रेलरचा चालक-मालक ईच्छापुर सुरत निवासी अब्दुल गफ्फार शहा वय ३४ वर्षे तसेच ट्रक चालक हसनबाग नागपुर निवासी अली मिर मोहम्मद हसन वय ५१ वर्षे दोघेही किरकोळ जखमी झाले.
दुसऱ्या अपघातात गोंडखैरीच्या राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यावर नागपुर वरुन अमरावतीला जात असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बस क्रंमाक एमएच-०९-ईएम-१४७८ ला ट्रक क्रंमाक केए-४०-ए-११८१ ने धडक दिली. याबाबत सविस्तर वृत्त असे की सदर ट्रकला हैद्राबादकडे जायचे होते.तो रस्ता चुकून अमरावती महामार्गानी निघाला असता टोलनाक्यावर रांगेत लागल्यावर त्याने हैद्राबाद रस्त्याची विचारणा केली असता माघारी फिरण्यास सांगण्यात आले.ट्रक चालक महेश ने ट्रक रांगेतूनच मागे घेण्याचा प्रयत्न करतांना मागाहून रांगेत येत असलेल्या बसला धडक बसली.त्यात बसच्या काचा फुटल्या सुदैवाने दोन्ही अपघातात कोणतिही प्राणहानी झाली नाही.
कळमेश्वर पोलीसांनी घटनेची नोंद करुन पिएसआय सुनिल कामडी एनपिसी गणेश मूतमाळी यांचेसह पुढील तपास सुरु केला आहे.
Thursday, December 28, 2017
टाटा सुमोने दुचाकी ला दिली धडक १ ठार २गंभीर
चिमूर/शहर प्रतिनिधी
चिमूर वरून ६ कि.मी. अंतरावर खरकाडा समोरील वळणावर सुसाट वेगाने परतीचा मार्गावर असलेल्या टाटा सुमो क्र. एम.एच. ३१ ए.एच. ५०३७ वाहनाने दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली असल्याने अपघातामध्ये श्रावण जांभुळे (खरकाडा वय ५५), याचा चिमूर रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तसेच गंगाबाई श्रावण जांभुळे (वय ४५) व नशीब बलवत्तर असल्याने उत्कर्ष प्रवीण जांभुळे (वय 5) वर्ष अपघातात त्याचा पाय फॅक्चर झाला आहे.
तसेच उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे दाखल केले असता श्रावण जांभुळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघात झालेले व्यक्ती खरकाळा येथील असून ते पिंपळगाव वरून गावाकडे येत असतांना गावालगतच त्यांचा अपघात झाला. तसेच धडक देणारा आरोपी हा गाडीसह पळ काढला असून त्याला भिसी पोलीस स्टेशन हद्दीत पकडण्यात आले आहे. पवन शामराव मुनघाटे (वय २४ रा. हिरापूर) असून तो साक्षगंध कार्यक्रमाला मुरपार येथे गेला होता. त्याला चिमूर पोलिसांचा स्वाधीन करण्यात आले असून समोरील तपास चिमूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिनेश लबडे यांचे मार्गदर्शनाखाली पी.एस.आय. सोनूले करीत आहे.
टाटा सुमोने दुचाकी ला दिली धडक १ ठार २गंभीर
चिमूर/शहर प्रतिनिधी
चिमूर वरून ६ कि.मी. अंतरावर खरकाडा समोरील वळणावर सुसाट वेगाने परतीचा मार्गावर असलेल्या टाटा सुमो क्र. एम.एच. ३१ ए.एच. ५०३७ वाहनाने दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली असल्याने अपघातामध्ये श्रावण जांभुळे (खरकाडा वय ५५), याचा चिमूर रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तसेच गंगाबाई श्रावण जांभुळे (वय ४५) व नशीब बलवत्तर असल्याने उत्कर्ष प्रवीण जांभुळे (वय 5) वर्ष अपघातात त्याचा पाय फॅक्चर झाला आहे.
तसेच उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे दाखल केले असता श्रावण जांभुळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघात झालेले व्यक्ती खरकाळा येथील असून ते पिंपळगाव वरून गावाकडे येत असतांना गावालगतच त्यांचा अपघात झाला. तसेच धडक देणारा आरोपी हा गाडीसह पळ काढला असून त्याला भिसी पोलीस स्टेशन हद्दीत पकडण्यात आले आहे. पवन शामराव मुनघाटे (वय २४ रा. हिरापूर) असून तो साक्षगंध कार्यक्रमाला मुरपार येथे गेला होता. त्याला चिमूर पोलिसांचा स्वाधीन करण्यात आले असून समोरील तपास चिमूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिनेश लबडे यांचे मार्गदर्शनाखाली पी.एस.आय. सोनूले करीत आहे.
टाटा सुमोने दुचाकी ला दिली धडक १ ठार २गंभीर
चिमूर/शहर प्रतिनिधी
चिमूर वरून ६ कि.मी. अंतरावर खरकाडा समोरील वळणावर सुसाट वेगाने परतीचा मार्गावर असलेल्या टाटा सुमो क्र. एम.एच. ३१ ए.एच. ५०३७ वाहनाने दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली असल्याने अपघातामध्ये श्रावण जांभुळे (खरकाडा वय ५५), याचा चिमूर रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तसेच गंगाबाई श्रावण जांभुळे (वय ४५) व नशीब बलवत्तर असल्याने उत्कर्ष प्रवीण जांभुळे (वय 5) वर्ष अपघातात त्याचा पाय फॅक्चर झाला आहे.
तसेच उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे दाखल केले असता श्रावण जांभुळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघात झालेले व्यक्ती खरकाळा येथील असून ते पिंपळगाव वरून गावाकडे येत असतांना गावालगतच त्यांचा अपघात झाला. तसेच धडक देणारा आरोपी हा गाडीसह पळ काढला असून त्याला भिसी पोलीस स्टेशन हद्दीत पकडण्यात आले आहे. पवन शामराव मुनघाटे (वय २४ रा. हिरापूर) असून तो साक्षगंध कार्यक्रमाला मुरपार येथे गेला होता. त्याला चिमूर पोलिसांचा स्वाधीन करण्यात आले असून समोरील तपास चिमूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिनेश लबडे यांचे मार्गदर्शनाखाली पी.एस.आय. सोनूले करीत आहे.
चंद्रज्योती च्या बिया बाबत इको-प्रो चे जनजागृती अभियान
Wednesday, December 27, 2017
अपघातात दोन जखमी
नागपूर :- अमरावती - नागपूर हायवे न ६ वर गोंडखैरी टोल नाक्या जवळ उभ्या ट्रकला होंडा ऍक्टिवा ची धडक २ गंभीर
Mscit वसुली च्या विरोधात पुरोगामी संघटना न्यायालयात दाद मागणार
चंद्रपूर-
चंद्रपूर जिल्ह्यात Mscit हा संगणक कोर्स उत्तीर्ण न केल्यामुळे अनेक शिक्षकांचे 10 वर्षापर्यंत ची लाखो च्या घरात असलेली रक्कम वसुली करण्याची कार्यवाही जिल्हा परिषदेने सुरु केली आहे, त्याबाबत न्याय मागण्यासाठी पुरोगामी शिक्षक संघटनेने न्यायालयाचे दार ठोठावण्याचे ठरवले आहे.
Mscit हा तांत्रिक कोर्स आहे व शिक्षकांची सेवा ही तांत्रिक सेवेत मोडत नाही तसेच 1.1.2008 किंवा त्यापूर्वी व त्यानंतर कधीही प्रशासनाने अश्या कोर्स करण्याची वा वसुलीबाबतची सूचना शिक्षकांना दिली नाही तसेच नियमानुसार 2008 पूर्वी सदर कोर्स केला नाही तर पुढील वेतनवाढी बंद करायला पाहिजे होत्या त्याही बंद न करता सुरूच ठेवल्या व आता एव्हड्या वर्षांनी वसुली होत आहे हे चुकीचे आहे, त्यातल्या त्यात दरम्यानच्या काळात सेवानिवृत्त व मृत झालेल्या शिक्षकांकडूनही आता वसुली करण्यात येत आहे. राजुरा येथील मृत शिक्षक शांताराम मोरे यांच्याकडूनही अशीच 3लाख 92 हजार वसुली करण्याचे आदेश दिले आहे, त्यांच्या परिवाराला मिळणाऱ्या 4लाख निवृत्ती उपदानातून हि रक्कम कपात करण्यात येणार आहे त्यामुळे त्या कुटुंबासमोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. याविरोधात सर्व अधिकाऱ्यांकडे दाद मागूनही न्याय मिळत नसल्याने महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती अन्यायग्रस्त शिक्षकांसह मा.न्यायालयाकडे दाद मागणार आहे.
अश्या प्रकारची वसुली कोणाकडून होत असेल तर पुरोगामी शिक्षक संघटनेशी संपर्क करावा असे आवाहन विजय भोगेकर, नारायण कांबळे, दीपक वर्हेकर, हरीश ससनकर, प्रतिभा उदापुरे, सुनीता इटनकर, शालिनी देशपांडे, पौर्णिमा मेहरकुरे व अन्य पदाधिकारी यांनी केली आहे.
हरीश ससनकर
जिल्हा सरचिटणीस, चंद्रपूर
‘सुंदर मी होणार नाही, तर सुंदर मी करणार’
कर्मयोगी बाबा आमटे यांचा जन्म दिन समाज दिन म्हणून साजरा केला जातो. आज आनंदवनात अनाम वृक्षांची स्मरणशीला आणि अनाम मूक कळ्यांचीस्मरण शिला तसेच कर्मयोगी बाबा आमटे व साधना आमटे यांच्या समाधीला मान्यवरांच्या हस्तेपुष्पचक्र अर्पण करुन कर्मयोगी बाबा यांच्या १०३ व्या जयंती कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. आनंदवन निर्मित स्वरानंद आर्केष्ट्राच्या चमूने बाबांची गीते सादर करुन बाबांच्या आठवणी ताज्या केल्या. यावेळी संचिताचे कवडसे या लेख मालिकेतील डॉ. विकास आमटे यांच्या लेखाचे आणि कर्मयोगी बाबा आमटेच्या कवितांचे वाचन करण्यात आले. यावेळी निलकृष्ण देशपांडे लिखित महामानव गीत वंदना या काव्यसंग्रहाचे प्रकाशनही करण्यात आले. कार्यक्रमाला डॉ. विकास आमटे, डॉ. भारती आमटे, गुलानी, सुधाकर कडू, डॉ. विजय पोळ, सदाशिव ताजने, गौतम करजगी, पल्लवी आमटे, सोमनाथ रोडे, प्रा. श्रीकांत पाटील, आनंद निकेतन महाविद्यालय वरोराचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे, शेखर नाईक, माधव कविश्वर, सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी, जोडो भारत अभियानात सहभागी मंडळी, आनंदवन मित्र मंडळ वरोरा, आनंदवनातील कार्यकर्ते सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे संचालन रवींद्र नलगरीवार यांनी केले. कार्यक्रमाची सांगता ‘जोडो भारत’ या गिताने झाली.
Tuesday, December 26, 2017
6 जानेवारीपासून नागपुरातखासदार सांस्कृतिक महोत्सव
दर्जेदार कार्यक्रमांची नागपूरकरांना मेजवानी
समाज घडविणाऱ्या शिक्षण क्षेत्राच्या दुरावस्थेची खंत
पारशिवणी तालुका प्रतिनिधी ::
शिक्षका पेक्षा समाजात कुणीच वरचढ नाही कारण एक शिक्षक हा समाजातील एक पिढी घडवितो,तेव्हा शासकिय स्तरावर या शिक्षण क्षेत्राकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असताना देखील त्या कडे कानाडोळा होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.ज्याला कारणीभूत म्हणजे शिक्षन क्षेत्राचे सपाट्याने होत चाललेले खाजगीकरन.देशातील नावाजलेल्या प्रतिष्ठानांच्या हातात शिक्षन क्षेत्राची दोरी गेलेली असल्या मुळेच एक चांगला समाज व देशाला नावलौकिक मिळवून देणारे देशहिताचे कर्णधार घडविणाऱ्या शिक्षण क्षेत्राची सध्या दुरावस्था झालेली असल्याची खंत शिक्षक आमदार ना.गो.गाणार यांनी वेध प्रतिष्ठान तर्फे आयोजित शिक्षक गौरव पुरस्कार कार्यक्रमा दरम्यान व्यक्त केली.
विदर्भ हिंदी साहित्य सम्मेलन सभागृह सीताबर्डी,नागपूर येथे वेध प्रतिष्ठान तर्फे आयोजित शिक्षक गौरव पुरस्कार कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्रकाश एदलाबादकर हे होते.तर प्रमुख अतिथी मध्ये शिक्षक आमदार नागो गाणार,दिपेंद्र लोखंडे शिक्षणाधिकारी जी.प.नागपूर यांची प्रमुख उपस्थिती होती.दरम्यान वेध प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी प्रमाणे पाच शिक्षकांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.यावेळी योगेश माणिकराव वासाडे राहणार टेकाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोर्डा,रामटेक पंचायत समिती येथे शिक्षक म्हणून कर्त्याव्यावर असून वेध प्रतिष्ठान तर्फे साने गुरुजी शिक्षक गौरव पुरस्काराने सपत्नीक गौरविण्यात आले तर वैशाली गेडाम यांना शिक्षनतज्ञ जे.पी.नाईक शिक्षक गौरव,हसीना शेख यांना साने गुरुजी शिक्षक गौरव पुरस्कार,मीना खाडे यांना शिक्षन वेध कार्यकर्ता पुरस्कर्तेना शॉल श्रीफळ व सम्मान चिन्ह प्रदान करून शिक्षकांचा गौरव करण्यात आला.
निसर्गाची समर्थन लढा देणारी स्त्री अंधश्रद्धा मुळे दुर्बल बनली
- प्रज्ञा राजूरवाडे
निसर्गाने स्त्रीला निर्मितीक्षम बनविले आहे व त्या आंतरिक क्षमतांचा उपयोग तिने जेव्हा तिला संधी मिळाली तेव्हा तिने या संधीचा उपयोग करून आपले कर्तृत्व दाखवून या राष्ट्राची उध्दारशक्ती बनवली परंतु इथल्या काही मनूप्रणित व्यवस्थेने तिचे अस्तित्व कवडीमोलाने केले व तिला दिनदुबळे बनविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे महिलांची उन्नती व्हावी यासाठी महिलांचे सम्मेलन घडवून आणावे, त्यांनी आपले विचार, सुख, दुःख मांडावेत त्यांची वाचनालये असावीत जातीभेद, आंध्रश्रद्धा दूर सारून त्या संघटीत व्हाव्यात यासाठी सर्व सोयी पुरुषाकरिता स्त्रियांसाठी सर्व व्यथा हे कोण बोलते शास्त्र आता द्यावे हात झुगारोनी असा इशारा राष्ट्रसंतांनी दिला होता. महिलांचे सबलीकरण व ग्रामगीता या विषयावर श्री गुरुदेव सेवा मंडळ चिमूर क्रांतिभूमी येथे राष्ट्रसंतच्या ४९ व्या पुण्यतिथी निमित्य महिलांच्या सबलीकरणाची अजूनही आवश्यकता का आहे ? हे मांडत असतांना बार्टी समतादूत प्रज्ञा राजूरवाडे बोलत होत्या.
तसेच या कार्यक्रमाचे उदघाटक चिमूर नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा शिल्पाताई राचलवार तसेच अध्यक्ष नेहरू कनिष्ठ महिविध्यलय चिमूरच्या प्राचार्य श्रीमती रेखाताई जोशीराव मार्गदर्शक म्हणून नगरसेविका छायाताई कंचर्लावार, डॉ शोभाताई नवले, वेणूताई सहारे, रेखाताई शिंगरे तसेच आदी मंचावर उपस्थित होते.
तसेच प्रज्ञा राजूरवाडे आपल्या मार्गदर्शनात म्हणाले कि, आजही स्त्री भाकडकथा, खोट्या काल्पनिक, निराधार, आंध्रश्रद्धा व जातीयतेच्या मानसिकतेतून बाहेर निघाली नाही म्हणून तिच्या या अज्ञानामुळे तिच्या प्रगतीपथावर असलेली पावले फारशी पुढे न जात जगाच्या जागी सुटून बसली आहे असे प्रकारचे मार्गदर्शन या ठिकाणी " बार्टी समतादूत प्रज्ञा राजूरवाडे बोलत होते."
लेखनस्पर्धेचा निकाल जाहीर
लेखनस्पर्धेचा विषय : शेतकरी आत्महत्त्या
| ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
१. ३१ जानेवारी २०१८ मध्ये आयोजित मुंबई येथे आयोजित चवथ्या अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनात पारितोषिक वितरण केले जाईल.
|