घरात मिळाली देशी दारु
चिमूर/प्रतिनिधी
दारूबंदी कठोर सुरु असल्याने अवैध विक्रेते नवीन नवीन शक्कल लढवीत आहेत. पोलिसांनी घराची कसून तपासनी केली असता घराच्या भिंतीच्या आत विद्युत प्रवाहावर चालणारे प्लायवूडचे कपाट आढळले. कपाटाच्या पाहिल्या भागात किराणा माल आढळून आला, तर कपाटाच्या आत भागात १७ पेट्या देशी- विदेशी दारु साठा आढळून आला.
चिमुर-मौजा मालेवाडा येथील सैराट दारु तस्कर,जगदीश रामटेके याच्या राहाते घराची झडती चिमुर पोलिस ठाण्याचे ठाणेदार दिनेश लबडे व त्यांच्या चमूने आज सकाळी घेतली असता, देशी दारुच्या १७ पेट्या घरात आढळून आल्यात. दारु तस्कर जगदीश रामटेके याच्यावर अवैधरीत्या दारु विक्री सबंधात यापूर्वी सुध्दा ५ गुन्हे चिमुर पोलिस ठाण्यात नोंद आहेत.पोलिसांच्या कारवाईला जगदीश रामटेके जुमानत नसल्याचे आजच्या त्याच्याविरुद्धच्या ६ व्या पोलिस कारवाई वरुन लक्षात येते.जगदीश रामटेके संदर्भात तळीपार प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याचे ठाणेदार दिनेश लबडे यांनी सांगितले
जगदीश रामटेके याच्या घरी आज सकाळी ९ वाजता दरम्यान अवैधरीत्या दारु विक्री सबंधात चिमुर पोलिसांनी धाड टाकली असता,जगदिशच्या पत्नीने दारु व्यवसाय बंद असल्याचे सांगितले व घर तपासनीस अप्रत्यक्षरीत्या विरोध दर्शविला होता.परंतु चिमुर पोलिस पुर्ण तयारीने आली होती. दारु साठा संरक्षित ठेवणारे कपाट,घराच्या भिंतीत असल्याने,जगदीश रामटेके व त्याची पत्नी बिनधास्तपणे दारु विकायचे.जगदीश रामटेकेची मुजोरी व दादागीरी एवढी वाढली होती कि,तो अनेक सभ्य व्यक्तींना मारहान सुध्दा करायचा.
माञ,चंद्रपूर जिल्हा पोलिस अधिक्षक नियती ठाकर,ब्रम्हपुरी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत परदेशी,हे दारु तस्कर जगदीश रामटेके बाबत इतंभूत माहिती घेत होते.जगदीश रामटेके बाबत सर्व माहिती संकलन केल्यानंतर जिल्हा पोलिस अधिक्षक चंद्रपूर व उपविभागीय पोलिस अधिकारी ब्रम्हपुरी यांनी,चिमुर पोलिस ठाण्याचे ठाणेदार दिनेश लबडे यांना जगदिशच्या दारु व्यवसायाबाबत अवगत केले आणि त्याचा दारु साठा पकडण्या करीता सापळा रचण्यास,दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ठाणेदार दिनेश लबडे यांना मार्गदर्शक सुचना केल्या.
चिमुर ठाणेदार,जगदीश रामटेकेवर पाळत ठेवून होते व त्याचा दारुसाठा पकडण्या करीता योग्य संधी बघत होते.आज संधी लाभली आणि जगदिशचा दारुसाठा चिमुर पोलिसानी,जगदिशच्या घरुन ताब्यात घेतला.
चिमुर पोलिस ठाण्याचे ठाणेदार दिनेश लबडे यांनी जगदीश बरोबर त्याच्या पत्नीला आरोपी बनविले आहे.जगदिशची पत्नी पोलिसांच्या ताब्यात असून,जगदिशच्या मागावर ठाणेदार लबडे आहेत.
पुढील योग्य ते कारवाई, जगदीश रामटेके यांच्यावर करणार असल्याचे,ब्रम्हपुरी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत परदेशी व चिमुर पोलिस ठाण्याचे ठाणेदार दिनेश लबडे यांनी संकेत दिले.
सैराट दारु तस्कर जगदीश रामटेके याच्या मुसक्या आवळण्याच्या कामाला पोलिस प्रशासन आता वेग देणार असून आज पकडलेल्या दारु साठ्याची किंमत ८० हजार रुपये आहे.