সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, December 09, 2017

प्रगत तंत्रज्ञान, एक वरदान

 


 
 
 
आज शैक्षणिक तंत्रज्ञान म्हणजे अध्ययन अध्यापन प्रभावी करण्यासाठी माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर विविधतेने करण्यात येत असलेला आढळू6 येतो. आजच्या काळात मुले सहज तंत्रज्ञानाचा वापर करत असलेले आढळून येत आहेत. तंत्रज्ञानात जसजशी प्रगती होत आहे, तसतसे त्याच्या अध्यापन वापराबाबत विचारमंथन घडून येत आहे. आज नवनवीन संकल्पना शिक्षण क्षेत्रात वापरल्या जात आहेत.
    महाराष्ट्रात शिक्षकांनी स्वतः तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे ठरविले. यातच संतोष भोबळे या ध्येयवेड्या शिक्षकाने शेगाव येथे उन्हाळा सुट्टीत पहिले तंत्रस्नेही संमेलन घेतले व महाराष्ट्रात खरी तंत्रस्नेही चळवळ सुरु झाली. महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव मा. नंदकुमार साहेब यांच्या मार्गदर्शनाने व प्रेरणेने अनेक शिक्षक झपाट्याने काम करू लागले. यात कोणी ऑफलाईन अप्स, ऑनलाइन व ऑफलाईन टेस्ट, बारकोड पद्धतीचा अवलंब, व्हिडिओ निर्मिती, ब्लॉग, वेबसाईट, सॉफ्टवेअर इ. साहित्य शिक्षक कसल्याही प्रशिक्षणाशिवाय केवळ मुले शिकवीत या हेतूने तयार करू लागली व आजही ते चालू आहे. 
    मुळात हे तंत्रज्ञान वापरण्याची का गरज भासली. याबद्दल माझा अनुभव सांगतो, मी जि. प.प्रा.शाळा लमाण तांडा बेळंब ता.उमरगा जि. उस्मानाबाद येथे कार्यरत आहे. सुरवातीला जेंव्हा शाळेत रुजू झालो तेंव्हा शाळेत उपस्थिती व गुणवत्ता या मोठ्या समस्या होत्या. कारण मुलांना शाळेत येण्यापेक्षा खेळण्यात व टी. व्ही. पाहण्यात खूप मजा वाटायची. याला कारण होते ते आपली पारंपरिक शिक्षण पद्धती. जेंव्हा मी लोकांना शिक्षणाचे मी महत्व पटवून दिलें व शाळा लोकवाट्यातून शाळा ई-लर्निंग व डिजिटल केली तेंव्हा शाळेचे रुपडच बदलेले.
       आज मुलांना शाळेतच मोबाईल, संगणक, टॅब, प्रोजेक्टर, व्ही.आर बॉक्स,एल. ई. डी. डी.व्ही.डी.इ. साहित्य पहावयास व हाताळवयास मिळत आहे. यामुळे शाळेत 100% उपस्थिती राहत आहे.  तसेच शाळा 100% प्रगत आहे. यासाठी मोलाची साथ लाभली ती उस्मानाबाद जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष शिक्षणाधिकारी सचिनजी जगताप साहेब यांचे.
    आज मोबाईल हि माणसाची गरज बनली आहे. तेंव्हा त्याचा वापर शिक्षण क्षेत्रात न होईल तर नवलच. आज 4G तंत्रज्ञानामुळे मोबाईलचा वापर अध्ययनात सहजतेने कल्पकतेने करता येतो. 'M' लर्निंग हा शिक्षणाचा आमूलाग्र भाग बनू पाहतोय. इंटरनेटच्या सहज उपलब्धतेमुळे YOUTUBE वरून स्वयं अध्ययन व दूर शिक्षणात याचा सहज वापर होत आहे.
            ई-शिक्षणच्या माध्यमातून शिक्षण घेणे सोपे होते. विध्यार्थ्यांना खेळकर पद्धतीने शिकविले जाऊ शकते. संगणक शिक्षणाच्या माध्यमातूनही आपण विध्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देऊ शकतो. स्मार्ट बोर्ड हा प्रोजेक्टरच्या पुढचा टप्पा आहे. अध्ययन प्रक्रिया अधिकाधिक आनंददायी व कृतीयुक्त बनली आहे. वर्गाध्ययनाचा चेहराच पूर्णतः बदललेला आहे. टॅॅब स्कूल, डिजीटल स्कूलच्या माध्यमातून शाळांचा दर्जा उंचावत आहे.  
        आता या स्पर्धात्मक जगात आम्ही शिक्षण आणि तंञज्ञान यात फरक करु शकत नाही. आजकाल तंञज्ञान शिक्षण ही व्यापक संकल्पना बनत आहे. शिक्षणाचा दर्जा वाढत आहे. यात नवनवीन ट्रेड येत आहेत. या आणि अशा नवनवीन संकल्पना शिक्षण क्षेञात वापरण्यावर भर दिला जात आहे .ज्यामुळे शिक्षणाची गुणवत्ता वाढण्यास हातभार लागत आहे. तंञज्ञानाच्या साह्याने शिक्षक शिक्षण प्रक्रिया प्रभावी व उत्साही करत आहेत , त्यामुळे महाराष्ट्र  100% प्रगत झाल्याशिवाय राहणार नाही .त्यामुळेच प्रगत तंञज्ञान शाळांसाठी एक वरदान ठरत आहे.  
 
 श्री.खोसे उमेश रघुनाथ 
            प्राथमिक शिक्षक 
      जि.प.प्रा.शा.ल.तां.बेळंब
     ता.उमरगा जि.उस्मानाबाद
     Mo.No.9764412501
 
 

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.