সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, December 09, 2017

पेंचच्या पाण्यावर पहिला हक्क फक्त शेतक-याचा

बच्चू कडू ; निमखेडा येथे प्रहार संघटनेचे हंटरमार शेतकरी आक्रोश सभेचे आयोजन

पारशिवणी/ तालुका प्रतिनिधी ::
जगाचा पोशिंदा शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम शाषणा द्वारे करण्यात येत आहे.शेतकर्यांपासून तर सामान्य माणसाला ‘अच्छे दिन’ दाखविण्याच्या भुलथापा देऊन हे सरकार सत्तेवर आलं शेतकऱ्यांचं शेतमाला वर आस्मानी व सुल्तानी संकट कोसळले असतांना पेंच प्रकल्पातील पाणी देखील शेतकऱ्यांना पुरविण्यात आले नाही शाषणाने पेंच धरणाचे पाणी फक्त शेतकर्यांचा शेतीच्या सिंचनासाठीच आरक्षित ठेवावे कारण धरणाच्या पाण्यावर पहिला हक्क हा शेतकर्यांचाच अशे वक्तव्य प्रहार संघटनेचे संस्थापक,आमदार बच्चू कडू यांनी
तालुक्यातील निमखेडा (गो.पा.) येथे आयोजित प्रहार संघटनेच्या क्षेत्रातील शेतकरी,शेतमजूर,दिव्यांग युवक,बेरोजगारांच्या प्रश्नांवर शिवसेना-भाजप युती सरकारच्या अन्यायकारी धोरणाचा निषेधार्त प्रहार हंटरमार शेतकरी आक्रोश सभेचे आयोजना दरम्यान केले.

कार्यक्रमाल प्रहार संस्थापक बच्चु कडु,प्रहार रामटेक विधानसभा क्षेत्र संयोजक रमेश कारामोरे,प्रहार शेतकरी संघटना रामटेक क्षेत्र प्रमुख महेंद्र भुरे,किशोर बेलसरे, गज्जु घरडे,संगिता वांढरे,बाल्या रामेलवार यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाची सुरवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून करण्यात आलेली होती.प्रमुख मान्यवरांनी रामटेक,पारशिवणी,मौदा तालुक्यातील शेतकरी शाषणाच्या उदासीन धोरणांमुळे हतबल झालेले असताना प्रहारच्या नेतृत्वात क्षेत्रातील शेतकरी वर्गाला शाषणा विरोधात एल्गार फुंकण्यासाठी गावपातळी पासून तर तालुकास्तरापर्यंत प्रहार स्टाइलची आंदोलने पुकारण्या साठी शेतकरी वर्गाला एकत्रित आणण्याचे कार्य सध्या प्रहार करत असल्याची माहिती महेंद्र भुरे यांनी स्पष्ट केली.

सरकारचा भोंगळ कारभारचा फटका शेतकऱ्यांना पड़त असून शाषणाच्या बिनतारेच्या धोरणा मुळे लाखो एकर शेती चा सिंचनाचा होत आहे.नागपुर महानगर पालिकेने आपली पिण्याच्या पाण्या चा सोईसाठी इतर किंवा वेगळे धरण बांधुन पेंच धरणाचे पानी शेतकर्यांसाठी देण्यास आरक्षण वाड़विणे गरजेचे आहे मात्र युती तिल सत्ता नेते याकडे दुर्लक्ष करुण शेतकऱ्यांचा जीवाशि खेळत असल्याचा आरोप रमेश कारेमोरे यांनी करत स्थानिक भूमिपुत्राणा साथ दया ऐसे आव्हान व्यास पीठावरून केले.

संचालन प्रशांत चौहान,प्रास्ताविक देविदास तडस,आभार पुरण तांडेकर यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अमरदिप मथुरे, बैशाखु जनबंधु, प्रफुल चौहान, राहुल ईंगडे, गणेश सरोदे,श्रीकांत बावणकुडे,आकाश दिवटे,रामलाल पट्टा,भरत गोखे,उमेश माहाजन,गज्जु सावरकर,लक्षमण खंडार,लक्षमण ठाकरे,शंकर पोटभरे देविदास तडल,प्रशांत चौहान,पुरण तांडेकर,नरेश हिंगे,शुभम घावडे,दिगांबर हिंगनकर,प्रविण सेल्लारे,किशोर नांदुरकर,अतुल कडु, विनु घावडे,संदिप हिंगे,सोपान चौहान,आकाश हिंगे, सुभाष डोकरिमारे,गुणवान आंबागडे,किशोर नांदुरकर, मनोज चोपकर,गजानन चांदेकर,हेमराज तडस,नितेश लक्षने,रुपेश मदनकर,राहुल हिंगे,स्वपनिल वाडिभस्मे, राजकुमार चांदेकर,राजु वैरागडे,कल्पेश वैद्य,श्याम चांदेकर,सुनिल गजभिए,शिशपाल वाहने,हितेश आजरे, अशोक भलावी, यांनी प्रयत्न केले.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.