সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, November 20, 2017

मनसर उत्खनन स्थळी ‘हेरिटेज विक

रामटेक / -रामटेक व परीसरांत मोठया प्रमाणावर पुरातत्वीय दृश्टया महत्वाच्या वास्तु आहेत.या वास्तु आपला समृद्ध असा वारसा आहे.त्याचे जतन व संरक्षण करण्याची जबाबदारी आमच्यासोबत सर्वसामान्यांचीही असल्याचे प्रतिपादन भारतीय पुरातत्व विभागाचे नागपुर परिमंडळाचे अधिक्षक पुरातत्वविद् एन.ताहेर यांनी येथे केले. भारतीय पुरातत्व विभागाच्या नागपुर परिमंडळातर्फे ‘हेरिटेज विक’ दिनांक 19 ते 25 नोव्हेंबर 2017 रोजी आयोजित करण्यांत आला असून या सप्ताहाचे उद्घाटनपर कार्यक्रम रामटेक तालुक्यातील मनसर येथील हिडींबा टेकडी या उत्खनन स्थळी संपन्न झाला.येथील उत्खनन हे अलिकडेच करण्यांत आले असून 1992 ते 2004 या काळांत हे उत्खनन करण्यात आले व याठीकाणी वाकाटक कालीन महाल,सैनिक छावनी असलेले बांधकाम सापडले.हे ठिकाण पर्यटकांसाठीही आकर्शण ठरू षकेल असा आषावाद यावेळी बोलतांना रामटेकचे उपविभागीय अधिकारी राम जोषी यांनी व्यक्त केला.
याठिकाणी सध्या पुर्ण पहाडीला सुरक्षा भींत बांधण्याचे काम सुरू असून आगामी काळांत येथे पर्यटकांसाठी किमान पिण्याचे पाणी,बाथरूम यासारख्या सुविधा उभ्या करण्याचा विभागाचा प्रयत्न राहणार असल्याचे ताहेर यांनी यावेळी सांगीतले.
कर्यक्रमाला भारतीय पुरातत्व विभागाचे डाॅ ईझार हाषमी,श्री केम्पेगौडा व अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.यावेळी मीलींद अंगाईतकर यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले.
कार्यक्रमानंतर स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत येथील स्वच्छता करण्यांत आली.या संपुर्ण उत्खननस्थळाची यावेळी सर्वांनी भ्रमंती केली.या कार्यक्रमाला अधिकारी ,कर्मचारी यांचे कुटुंबिय उपस्थित होते हे विषेश.



শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.