সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, November 20, 2017

मरावे परी किर्ती रूपे उरावे


      
मानव जन्म हा एकच वेळा मिळत असतो. त्यासाठी मानव जन्म हा सार्थकी कसा लावावा हे आपनच ठरवायच असत. पुन्हा मनुष्य जन्म नाही, म्हणूनच असे जगावे की,सु-किर्ती राहीली पाहिजे पृथ्वीवर.
      निसर्गाला बोलता येत नसल तरी देखिल आपले अमुल्य जीवन परोपकार करण्यात मग्न असतात,आणि मनुष्य निसर्गाचे उदाहरण वांरवांर देत असतो पण त्यांच्या सारख आपन वागलो तर आपली ही किर्ती चोहिकडे पसरेल आणि हे ब्रीद वाक्य सार्थकी लागेल. *मरावे परी किर्ती रूपे उरावे*
तसेच आपन मानव असुन आपनास दया,ममता, वात्सल्य,प्रेम अनेक प्रकारच्या वेदना अन संवेदना असतात. हे अगदी सत्य असुन निसर्गाला त्या नसतात. पण निसर्ग हा मनुष्यापेक्षा जास्त देतो,तो विशाल हृदय असनारा असा दोन्ही हाताने पृथ्वीवासींना देतच असतोय. ...
        त्यांच्यापेक्षा आपनास खुप काही जास्त मिळाले असुन आपन परोपकारी वृत्तीने जर कार्य केले तर या विश्वात किर्ती रुपाने जीवंत राहू शकतो. जन्मोजन्मी,पिढ्यांपिढ्या मरावे परी किर्ती रूपे उरावे ही म्हण योग्यच आहे. विशाल हृदयाने समाजहितार्थ कल्यानकारी मोठी कार्य नाही केली तरी आपल्या संसारात सहिष्णूता,अंगी सहनशिलता राखून आपल्या परीसरात तरी आपली किर्ती अबाधित रहावी यासाठी प्रयत्नशिल राहून छोट्या मोठ्या गोष्टीतुन आपन आनंद मिळवु शकतो.
      दीन दुबळानां साहाय्य करुन,अनाथांचे अश्रू पुसून,भुकेल्यांना अन्न देउन मानव सेवा हिच सर्वात खरी सेवा करुन मानवांनी आपल्या जीवनाचे सार्थक केले पाहिजे.जीवन हे सुंदर गीत आहे.सुंदरतेने आपन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे,आणि दुसऱ्यांना ही आनंदात ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
    आपल्या शब्दांनी कोणाचेही मन दुखावणार तर नाही ना याची काळजी घेतली पाहिजे.प्रत्येकांच्या विचारांचा आदर करता आला पाहिजे.प्रत्येक
मानवांनी आपल्या जीवनाचे सार्थक केले पाहिजे.
  प्रत्येकांच्या हृदयात आपले स्थान निर्माण करता आले पाहिजे.जगायचे तर सारे जगतात दुसऱ्यांचा सुखात दुःखात सहभागी होता आले पाहिजे,त्यांच्या दुःखात आपणही दुःखी झालेतर, त्यांच्या सुखात आपण ही आनंदी झालो पाहिजे,कोणत्याही प्रकारचे लोभ,द्वेष,मत्सर करु नये,हे आपल्या पासून दूर ठेवने अत्यंत गरजेचे आहे.आपले मन विशाल व हृदयपण विशाल असले पाहिजे आहे.ही सर्व गुणे आपल्यात सामावून घेता आले पाहिजे.
         आपल्या विचारांच्या माध्यमांतून लेखणीच्या शस्त्रांनी समाजाला दिशा देण्याच कार्य ही महान अमुल्य सेवा आहे. साहित्यिक केव्हांच मरत नाहीत त्यांच्या विचारातून तो सदैव जीवंत राहुन जनसेवा करीत असतो.आपल्या विचारांच्या माध्यमांतून  लेखणीच्या जोरावर महान राष्ट्रसंत,लेखक,महाकवी,मुनी झालेले आहेत.जग जिंकण्याचे सामर्थ्य ही आपल्या मनुष्य जातीनेच केले असुन इच्छा शक्तिच्या जोरावर मोठे एव्हरेस्ट सारखे पर्वत सर केले आहे.मोठमोठे लढवय्ये, पंतप्रधान, राष्ट्रपती,राजे,महाराजे होवून गेले आहेत आपन आजही त्यांच्या कार्याचे बखान करतोय. आयुष्यात कधी पण सकारात्मक विचार असावे,नकारात्मक विचार करु नये.मरावे परी किर्ती रूपे उरावे,यासाठी मनुष्याला खुप मेहनत घ्यावी लागत असते,त्याग करावा लागतो,कष्ट करावे लागत असतात.
          प्रतिभा प्रत्येकात एकसारखी नसते, प्रत्येकात कमी जास्त प्रमानात असते.त्याला दिशा देण्याचे किंवा वाट दाखवण्याचे कार्य प्रतिभा संपन्न सत्तगुरु करतात,ते आपल्या शाळेचे गुरु,आईवडिल, भाऊबहिन,नातेवाईक किंवा अनेक प्रकारे गुरु पासुन जीवनात विद्या घेवून देवून मार्ग प्रशस्थ करु शकतोय.
    कोणत्याही परिस्थितीत मानवाला जगता आल पाहिजे.कुरघोडी करुन कूणाशी स्पर्धा करुन,चोरी करुन जगणाऱ्यांना ध्येय नसतं.नजरेसमोर काही मेहनत केली तर यश आपल्या जवळ चालत येतं.
त्यात ही चांगले आणि वाईट गुणांची निवड करुन अंगी बाळगुन समाजात वावरल्यास आपणास  हमखास किर्ती मिळेलच. किर्ती पाहिजे की अपकिर्ती पाहिजे,हे आपणच ठरवायच असते.जिथे सुमती असते तिथे अनिती नसते.जिथे सुसंस्कार असते तिथे कुसंस्कार नसते.ज्याच्या मनी चांगुलपणा असतो.तो कुणाच वाईट करु शकत नाही.आणि या प्रामाणिक संस्कारी लोकांची किर्ती अबाधित असते.    विशालकाय वृक्षांचीपन किर्ती आहे. चंदन वृक्षांचीपन किर्ती आहे. अश्या वेगवेगळया प्रकारच्या वृक्षापासुन खुप काही शिकायला मिळत असते. पानाफुला कडून
चंद्रसुर्या कडून,समुद्रा कडुन,पशुपक्ष्यां कडून शिकवन घेतली पाहिजे.

श्रीमती मिनाक्षी किलावत,                   मु.पो.ता.वणी,जिल्हा
  यवतमाळ  मो.नं.8888029763
   meenakilawat 2153@gmail.com

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.