पालघर/प्रतिनिधी -
शहादा जि.नंदुरबार येथे एका समारंभात मंत्री महोदयांनी वरील विधान करुन महीलांचा आपमान केला व आपली बुरसटलेली मनुवादी वृत्ती जगासमोर आणली अशी प्रतीक्रिया पालघर जिल्हा कॉग्रेस चे अध्यक्ष केदार काळे ह्यानी दिली .
दारूची विक्री वाढविण्यासाठी त्याला महिलांचे नाव दिल्यास त्या उत्पादनाची विक्री हमखास होते. त्यामुळे सातपुडा साखर कारखान्याने उत्पादित केलेल्या दारूचे नाव बदलून 'महाराजा' ऐवजी 'महाराणी'ठेवावे असा अजब सल्ला राज्याचे जलसंपदामंत्री व वैद्यकिय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी जाहिर सभेत कारखान्याच्या व्यवस्थापनाला दिला
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील सातपुडा साखर कारखान्याच्या गाळप हंगामास शनिवारी, 4 नोव्हेंबर रोजी प्रारंभ झाला. त्यास राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पर्यटनमंत्री जयकुमार रावल उपस्थित होते. कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांनी कारखान्याची माहिती सभेत दिली. त्यात त्यांनी आपल्याकडे डिस्ट्रिलरी प्रकल्प आहे मात्र मद्याची विक्री कमी होते, असे सांगितले.
तो धागा धरुन मंत्री महाजन यांनी सल्ला दिला. ते म्हणाले, "राज्यात सर्वाधिक देशी दारूची विक्री कोपरगावचे नेते शंकरराव काळे यांच्या कारखान्याची होते. त्यांच्या कारखानानिर्मित दारूचे नाव 'भिंगरी' आहे. तर माजी आमदार कोल्हे यांच्या कारखान्यातर्फे निर्माण होणाऱ्या मद्याचे नाव 'ज्यूली' आहे. त्याचप्रमाणे बाजारात ज्या उत्पादनांना महिलांचे नाव दिले आहे. त्यांची विक्री अधिक होते. ही वस्तुस्थिती आहे. मद्य व तंबाखूजन्य पदार्थांना असलेली नावे बहुतांशी महिलांची आहेत. जसे विमल, केसर गुटखा हे माव्याचे प्रकार बंदी असताना विकले जातात. त्यामुळे सातपुडा साखर कारखान्याने मद्य विक्री वाढवण्यासाठी 'महाराजा' ऐवजी 'महाराणी' करावे."अशा विधना मुळे बिजेपीचे महीलान विषई असलेले मत बाहेर आले आहे सत्तेची गुर्मी भाजपा सरकारला आली आहे पण जनता एकदा केलीली चुक परत करणार नाही व ह्या सरकारला सत्तेतून घालवतील असे केदार काळे म्हणाले .महीलांचा आपमान करणाऱ्या मत्र्याना मुख्यमंत्र्यानी मंत्रीमंडलातुन काढून टाकावे अशी मागणी पालघर जिल्हा कॉग्रेस कमीटी करीत आहे
Sunday, November 05, 2017
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য